शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय मार्गावरील वाहतूक धोकादायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

भंडारा-तुमसर आंतरराज्यीय रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून तुमसर शहरात याच मार्गाने वाहनांचा प्रवेश होतो. रस्ता दुपदरी असतांनाही तुमसर पंचायत समितीसमोर तसेच बाजार समिती व राजाराम लॉनसमोरील दुभाजक वाहनाच्या धडकेत तुटले आहे. येथे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहे. सध्या सदर दुभाजक रात्री वाहनचालकांना दिसत नाही.

ठळक मुद्देदुभाजक तुटले : बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरातील रस्त्यावरील तुटलेल्या दुभाजकांमुळे वाहतूक अत्यंत धोकादायक ठरत आहे. सदर रस्ता शहराचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. आंतरराज्यीय महामार्ग असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे या मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. गत दीड ते दोन वर्षांपासून या मार्गावर अनेक समस्या वाहनधारकांना भेडसावत आहे. तीन ते चार ठिकाणी मार्गावरील दुभाजक तुटलेल्या धोकादायक स्थितीत असून रात्री वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.भंडारा-तुमसर आंतरराज्यीय रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून तुमसर शहरात याच मार्गाने वाहनांचा प्रवेश होतो. रस्ता दुपदरी असतांनाही तुमसर पंचायत समितीसमोर तसेच बाजार समिती व राजाराम लॉनसमोरील दुभाजक वाहनाच्या धडकेत तुटले आहे. येथे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहे. सध्या सदर दुभाजक रात्री वाहनचालकांना दिसत नाही. किमान दुभाजक दुरुस्ती करुन रिफलेक्टर लावण्याची नितांत गरज असताना रस्त्याची देखभाल व नियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.तुमसर शहरातून सदर आंतरराज्यीय मार्ग कटंगी बालाघाट येथे जातो. २४ तास या रस्त्यावरुन वाहतूक सुरु असते. भरधाव वेगाने वाहने येथून जात असतात. त्यामुळे येथील दुभाजक वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरतो आहे. या मार्गाने वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचे नित्याचेच आवागमन होत असतांनाही त्यांचेही सदर रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कायमस्वरुपी येथे सुरक्षीततेच्या उपाययोजनेची गरज आहे. १५ वर्षापूर्वी सदर रस्त्याचे काम करण्यात आले होते. परंतु त्यानंतर मात्र दुरुस्तीसाठी दुर्लक्ष करण्यात आले आहे.शहरातून जाणारा हा रस्ता वाहतूकीसाठी अरुंद ठरत असून येथे अनेकदा लहान मोठे अपघात घडले आहेत. रस्त्यावर दुभाजक नसल्याने वाहनधारक जीव मुठीत घेवून वाहने चालवित आहेत. याच मार्गावरील दोन ते तीन ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने भरधाव वाहने खड्यातून जाताना बंद पडतात. त्यामुळे रस्त्यावर अनेकदा वाहनाची कोंडी देखील होते. वाहने अनियंत्रीत होवून दुभाजकावर आदळण्याची भीती वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक