शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

साकोली नगर परिषदेच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता

By admin | Updated: September 1, 2015 00:25 IST

साकोली आणि सेंदुरवाफा वासीयांचे स्वप्न पूर्ण होण्याची अखेर वेळ आली आहे.

आनंदोत्सव : जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप पाठविण्याचे आदेश संजय साठवणे साकोलीसाकोली आणि सेंदुरवाफा वासीयांचे स्वप्न पूर्ण होण्याची अखेर वेळ आली आहे. साकोलीत नगर पंचायत निवडणुकीची तयारी सुरू होती. परंतु आमदार बाळा काशीवार यांनी साकोलीत नगर परिषद व्हावी, यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. अखेर मंत्रालयाने साकोली नगर परिषदेच्या प्रस्तावाला मान्यता देऊन तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. प्राथमिक प्रारुप तात्काळ पाठविण्याचे आदेश राजीव आंबीकर कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिले आहे. हे आदेश दि. ३१ आॅगस्टचे असून जिल्हाधिकाऱ्यांनी साकोलीच्या तहसीलदारांना हे आदेश पाठविले आहे. दि. ३१ आॅगस्ट रोजीच्या पत्रानुसार, दि. १२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेअन्वये नवनिर्मित साकोली नगर पंचायतीत सेंदूरवाफा ग्रामपंचायत समाविष्ठ करून साकोली नगर परिषदेचा प्राथमिक उद्घोषणा नव्याने करण्याबाबतच्या प्रस्तावास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. तरी याप्रकरणी ग्राम पंचायत सेंदुरवाफा व साकोली नगर पंचायत मिळून साकोली नगर परिषद तयार करण्याबाबत मराठी व इंग्रजी प्राथमिक उद्घोषणेचे प्रारुप शासनाकडे तातडीने पाठविण्यात यावे, असे सदर आदेशात नमूद आहे. जिल्हा प्रशासनातर्फे साकोली नगर परिषदेची कारवाई पुर्णत्वास जात आहे. मागील काही दिवसांपासूनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. उशिरा का होईना आ.बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने नगर परिषद होण्याचे स्वप्न पुर्णत्वास जात आहेत. साकोली व सेंदुरवाफा येथील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन यासारख्या विविध सोयी सुविधा असून यात नगर परिषदेची भर पडणार असून आदेशाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.