शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM

शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी मालाची बोली बोलताना शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. येथे मास्क घातला जात नाही. सुमारे दोन तास अशीच गर्दी संपूर्ण बाजार समितीत होती. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी बाजार समिती आहे. मोठी उलाढाल येथे होते. जिल्ह्यातील प्रमुख मोठी बाजारपेठ आहे. जिल्हा प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे निर्देश दिले आहेत. परंतु सर्रास गर्दी येथे मोठ्या प्रमाणात दिसून येते.

ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. मात्र तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सामाजिक अंतर पाळले जात नाही.शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी परवानगी शासनाने दिली आहे. परंतु त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी मालाची बोली बोलताना शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. येथे मास्क घातला जात नाही. सुमारे दोन तास अशीच गर्दी संपूर्ण बाजार समितीत होती. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी बाजार समिती आहे. मोठी उलाढाल येथे होते. जिल्ह्यातील प्रमुख मोठी बाजारपेठ आहे. जिल्हा प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे निर्देश दिले आहेत. परंतु सर्रास गर्दी येथे मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे याठिकाणी गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने प्रशासनास ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे संघटक जगदीश त्रिभुवनकर, विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी प्रत्यक्षात बाजार समितीत जाऊन पाहणी केली. दरम्यान मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. त्यामुळे याविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, प्रभारी सचिव मिनाक्षी वासनिक, उपसचिव अनिल भोयर यांना शिवसेनेने जाब विचारला. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी आपण काय उपाययोजना केले आहात? निष्काळजीपणामुळे जर एखादी कोरोना रुग्ण आढळून आला तर बाजार समिती त्याला जबाबदार ठेवण्यात येईल असा इशारा दिला.गत दोन दिवसांपासून शेतमालाची आवक जास्त प्रमाणात झाल्यामुळे कास्तकारांनी गर्दी केली आहे. याठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून अनेकदा सूचना दिल्या जातात. परंतु कास्तकार ऐकत नाही. बाजार समितीत गर्दी नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समितीचे सचिव तथा उपसचिवांना जबाबदारी सोपवली आहे. तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करीत आहोत.-भाऊराव तुमसरे,सभापती, बाजार समिती, तुमसर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarket Yardमार्केट यार्ड