शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धडकले पाटबंधारे कार्यालयावर

By admin | Updated: September 29, 2014 22:59 IST

रिसाळा जलाशयावरील कर्मचाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप, पाण्यासाठी आक्रोश करडी (पालोरा) : रिसाळा जलाशयातील पाणी दि.२४ सप्टेंबर

चौकशीची मागणी : रिसाळा जलाशयावरील कर्मचाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप, पाण्यासाठी आक्रोशकरडी (पालोरा) : रिसाळा जलाशयातील पाणी दि.२४ सप्टेंबर पासून शेतीसाठी सोडण्यात आले. मात्र वाटपावर गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे नियंत्रण नाही. दि.२९ सप्टेंबरपर्यंत करडी परिसरात पाणी पोहचले नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे घेवून गैरप्रकार केल्याचा आरोप करीत शेकडो शेतकरी तिरोडा तालुक्यातील सितेपार येथील कार्यालयावर धडकले. परंतु कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पळाले. प्रकरणी चौकशी आणि शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सितेपार गावी रिसाळा जलाशयाचे पाणी वाटप करण्याचे, नियंत्रण व देखभाल दुरूस्तीचे अधिकार असलेले पाटबंधारे विभागाचे कार्यालयावर आहे. परंतू सदर ठिकाणी अधिकारी बसत नसल्याने कर्मचाऱ्यांवर त्यांचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे अनेकदा दिसून येते. कर्मचाऱ्यांचे बेबंदशाही धोरण येथून राबविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून अनेकदा होतो. परंतू अधिकारी दखल घेत नसल्याने कर्मचाऱ्यांचे धाडस वाढलेले आहे. पाणी वाटपात गैरप्रकार करणे नेहमीचे होऊन बसले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी न पोहचविता सुरूवातीलाच पाण्याचे वाटप केले जाते. ओलिताचा कर वसूल केला जात असताना बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. कोरड्या दुष्काळाने उत्पन्नात घट होते ती वेगळीच.दि.२४ सप्टेंबर २०१४ पासून रिसाळा जलाशयाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. मात्र ५ दिवसाचा कालावधी लोटत असताना शेवटच्या टोकावरील करडी व मुंढरी शेतशिवारात पाणी पोहचले नाही. करडी येथील कालव्याला पाणी सोडण्यात न आल्याने ठाणा कालवा व कनार कालवा कोरडा आहे. परिसरातील शेतीला भेगा पडल्या असून पिके करपली आहेत. त्वरित पाण्याची गरज असताना जलाशयाजवळील शेतकऱ्यांनाच पाण्याचा लाभ दिला जात आहे. पाणी सोडलेले असताना पाणी वाटपाचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी अजुनपर्यंत विभागाचे अधिकारी व कर्मचारी कालव्यावर पोहचलेले नाही. बेबंदशाहीचा प्रकार सर्रास सुरू आहे. संतप्त करडी येथील शेकडो शेतकरी दि.२८ सप्टेंबर रोजी सितेपार कार्यालयावर धडकले असता कार्यालयात कोणतेही कर्मचारी वा अधिकारी दिसून आले नाहीत. कार्यालयाला कुलूप ठोकून कर्मचारी पळाले असल्याची शंका आहे. आक्रोशित शेतकऱ्यांनी रिसाळा जलाशयातून निघणाऱ्या कालव्याचे निरीक्षण केले असता मुख्य कालव्याच्या उपशाखांचे सर्व गेट तोडलेले दिसून आले. त्याकडे कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्याचा परिणाम म्हणून करडी पर्यंत पाणी पोहचले नाही. त्यामुळे नापिकी होवून शेतकऱ्यांवर उपासमारिची वेळ आहे. शेतीला त्वरित पाणी न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नसल्यांचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांकडून मुख्य कालवा कापून काही शेतकऱ्यांना पाणी वाटप केला जात असल्याचा आरोप आहे. प्रकरणी चौकशी करावी अन्यथा न्यायासाठी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशारा शेतकरी निलेश इलमे, निलेश काढवे, नत्थू गाढवे, भागवत डोहळे, होलू शहारे, राजेश तिजारे, वासुदेव साठवणे, राजेश भारतकर, प्रकाश हलमारे, राजेश डोहळे, शामराव मोहतुरे, शिवराम कावळे, बाळू सार्वे, जगदिश मुलतानी, अमोल पालांदूरकर, टिनू राऊत, नामदेव खोब्रागडे, भाऊराव मोटकरे, शामू पंचबुद्धे व अन्य शेतकऱ्यांनी प्रसिद्धी निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)