शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हळद पीक अनुदानापासून वंचित

By admin | Updated: October 22, 2014 23:14 IST

नगदी पिक म्हणून हळद या पिकाची ओळख आहे. पिकात वाढ व्हावी म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र पवनी येथील कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या

पालोरा (चौ.) : नगदी पिक म्हणून हळद या पिकाची ओळख आहे. पिकात वाढ व्हावी म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र पवनी येथील कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून अनुदान मिळाले नाही. सदर पिकाचे अनुदान मिळावे म्हणून परिसरातील शेतकरी तालुका कृषी कार्यालयाचे उबंरठा झिजवित आहेत, मात्र त्यांना अजुनपावेतो अनुदान मिळाले नाही.शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी व्हावा, शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून प्रशासनाकडून शेतकऱ्यांकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत. पवनी तालुका धान पिकाचा म्हणून प्रसिद्ध आहे. या भागातील शेतकरी धान पिक जास्त प्रमाणात घेतात.मात्र धान पिकाला लागणारा जास्त खर्च व पिकाला मिळणारा अल्प भाव त्यामुळे शेतकरी कर्जाच्या डोंगरात सापडला होता. प्रशासनाच्या अनुदानामुळे व विविध योजनांच्या सहाय्याने परिसरातील शेतकरी नगदी पिक हळद पिकाकडे वळले आहेत. पवनी तालुक्यातील पालोरा, लोणारा, बाम्हणी, वलनी, शीमनाळा, जुनोना, भेंडाळा, आसगाव परिसरात मोठ्या प्रमाण हळदीचे पिक घेतले जात आहे. हळद पिकासोबत अन्य पिकेही घेतली जात आहे. मात्र प्रशासनाकडून मिळणारा अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जुनोना येथील दिलीप मोहरकर, सुनिता वंजारी, पंढरी भुरे, विठ्ठल मोहरकर, ईश्वर वंजारी, युवराज मोहरकर, ज्ञानेश्वर वंजारी, भूषण भुरे, जागेश्वर वैद्य, गोपू वैद्य, पुरुषोत्तम मेंढे, अनिल वैद्य, मुरलीधर वंजारी आदी शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. (वार्ताहर)