शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा- तुमसर- बालाघाट रस्त्याचे हाेणार विस्तारीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहर ते तुमसर शहराला जाेडून ते मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्याला जाेडण्यात येणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी बरीच जुनी मागणी आहे. नॅशनल हायवे अथाॅरिटी ऑफ इंडियाने या मार्गाचे चाैपदरीकरण करण्यासाठी याेजनेला अंतीम रुप दिले आहे. भंडारा बाहेरुन नुकत्याच ४२१ काेटींच्या बायपास बांधकामाला सुरुवात झाली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आंतरराज्यीय रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा-तुमसर ते बालाघाट पर्यंतच्या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात डीटेल्स प्लॅन रिपाेर्ट (डीपीआर) तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. उल्लेखनीय म्हणजे भंडारा- तुमसर या २७१ या राज्यमार्गाचे रुपांतरनही राष्ट्रीय महामार्गात केले जाणार आहे.जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहर ते तुमसर शहराला जाेडून ते मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्याला जाेडण्यात येणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी बरीच जुनी मागणी आहे. नॅशनल हायवे अथाॅरिटी ऑफ इंडियाने या मार्गाचे चाैपदरीकरण करण्यासाठी याेजनेला अंतीम रुप दिले आहे. भंडारा बाहेरुन नुकत्याच ४२१ काेटींच्या बायपास बांधकामाला सुरुवात झाली आहे. याचवेळी भंडारा- तुमसर - बालाघाट मार्गाचेही चाैपदरीकरण करण्यात येईल, अशी घाेषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. भंडारा शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या राज्य मार्गाचे जाेडणी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ ला करण्यात येणार आहे. खापा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ला जुडवून तुमसर व नंतर सिहाेरा आणि मध्यप्रदेशच्या सिमेपर्यंत या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करुन जाेडण्यात येणार आहे. विद्यमान स्थितीत भंडारा ते तुमसर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणाहून उखडलेल्या रस्त्याची अधूनमधून डागडुजी करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दाेन राज्यांना जाेडणारा हा आंतरराज्यीय महत्वपूर्ण असतानाही दाेन दशकापासून या रस्त्याचे विस्तारीकरण रखडल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले हाेते. धान उत्पादक शेतकऱ्यांनाही या रस्त्याहून आवागमन करणे कठीण जाते. रस्त्याचे बांधकाम झाल्यास आवागमन हाेणे सुलभ तर हाेईलच या शिवाय वेळेचीही बचत हाेणार आहे. बालाघाट जिल्ह्याला जाेडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव २०१९ मध्येच तयार करण्यात आला हाेता. या संदर्भात खासदार सुनील मेंढे यांनी एनएचएआय साेबत सातत्याने पत्रव्यवहार करुन ना. नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली हाेती. त्यामुळेच या रस्त्याच्या विस्तारीकरणाबाबत डीपीआर विचाराधीन आहे. मंजुरी मिळताच या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग