शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या रिकाम्या खोल्या बनणार गोदाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST

मोहाडी - शाळा बंद आहेत. विद्यार्थी मागील वर्षीपासून घरीच आहेत. त्यामुळे शाळेतील रिकाम्या खोल्यांवर प्रशासनाची नजर गेली अन ...

मोहाडी - शाळा बंद आहेत. विद्यार्थी मागील वर्षीपासून घरीच आहेत. त्यामुळे शाळेतील रिकाम्या खोल्यांवर प्रशासनाची नजर गेली अन आता जिल्हा परिषदेच्या शाळा धान्याची कोठार बनणार आहेत. मागील वर्षी कोविड-१९ या विषाणूने जगभरात पाऊल टाकले. त्यामुळे सामान्य परिस्थिती प्रभावित झाली. मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या आहेत. यावर्षीच्या कोविड-१९ च्या विषाणूने भयावह परिस्थिती निर्माण केली होती. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक हादरून गेले होते. सध्या परिस्थिती सुधारली आहे. कोविड-१९ ची तिसरी लाट येण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्यानंतर कधी शाळांच्या खोल्या विद्यार्थ्यांनी गजबजतील याची साशंकता आहे. परिणामी काही दिवस तरी शाळांच्या खोल्या रिकाम्या राहणार आहेत. या रिकाम्या शाळांच्या खोल्यांत आता जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्या धान्याची गोदामे बनणार आहेत. याबाबत १ जून रोजी शिक्षण विभागाला पत्र दिले. त्या पत्रानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद माध्यमिक शाळांच्या इमारती आपणास सन २०२०-२१ या कालावधीसाठी धान खरेदीकरिता पर्यायी गोदामांची व्यवस्था म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा अटी व शर्तीच्या अधिन राहून उपलब्ध करुन देण्यात येणार असे जिल्हा पणन अधिकाऱ्यांना २ जून रोजीच्या पत्रात कळविले आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांच्या रिकाम्या खोल्या देताना काही अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. शाळेच्या इमारतीची कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. याची काळजी घ्यावी लागेल. शाळेतील डेस्क-बेंच तसेच इतर साहित्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. शाळेची इमारत/डेस्क-बेंच व इतर साहित्याचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल. शाळेचे विद्युत देयक अदा करावे लागेल. इतर अनुषंगिक बाबीकरिता जबाबदारी राहील. शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरु करण्यात आल्यास तत्काळ शाळा इमारत रिकामी व स्वच्छ करुन देण्याची जबाबदारी आपली राहील अशा अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. या अटीवरच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या रिकाम्या खोल्या देण्याचे निर्देश जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील किती शाळा आधारभूत धान साठवणुकीसाठी वापरण्यात येणार आहेत त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.