शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आई सज्जावर आणि मुलगा पंख्याला लटकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:01 IST

शनिवारी रात्री अचानक घर पाण्याच्या विळख्यात सापडले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. मरणाच्या दारात उभे असलेल्या या मायलेकांनी मदतीसाठी घराच्या व्हेंटीलेटरमधून आवाज दिले. परंतु उपयोग होत नव्हता. अखेर मुलाने आपल्या वृद्ध आईला घराच्या सज्जावर बसविले आणि बाहेरून कुणाची मदत मिळते का म्हणून पंख्याला लटकून आवाज देऊ लागला. परंतु वाढत्या पुरात आणि किर्रअंधारात मदतीची अपेक्षाच नव्हती.

ठळक मुद्देमहापूरात रात्र काढली अन्न पाण्यावाचून : तरुणांच्या मदतीने नऊ कुटुंबासह मायलेक बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शनिवारची रात्र. अचानक पुराचे पाणी वाढू लागले. नागपूर नाका परिसरातील छत्रपती शिवाजी नगरही पाण्याखाली आले. एका घरात ७५ वर्षीय वृद्धा आणि तिचा ५२ वर्षीय मुलगा दोघेच होते. पुराचे पाणी चढत होते. क्षणाक्षणाला मरण दिसत होते.वृद्ध आईला सज्जावर आणि मुलगा पंख्याला लटकून कुणाची मदत मिळते का याचा अंदाज घेत होता. अख्खी अन्नपाण्यावाचून काढल्यानंतर अखेर रविवारी दुपारी काही तरुणांचे लक्ष गेले. बोटीच्या मदतीने घर गाठून या दोघांना बाहेर काढले. एवढेच नाही तर या परिसरातील नऊ कुटुंबांनाही सुरक्षित हलविले.वैनगंगेच्या महापुराने भंडारा शहरात हाहाकार उडाला. अनेकांची घरे पाण्याखाली गेली. नागपूर नाका परिसरातील छत्रपती शिवाजी नगरही पुराच्या पाण्याने वेढले गेले. याच परिसरातील राजेश देवराम चिंचखेडे (५२) आणि त्यांची आई अनुसया देवराम चिंचखेडे (७५) आपल्या घरात होते.शनिवारी रात्री अचानक घर पाण्याच्या विळख्यात सापडले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. मरणाच्या दारात उभे असलेल्या या मायलेकांनी मदतीसाठी घराच्या व्हेंटीलेटरमधून आवाज दिले. परंतु उपयोग होत नव्हता.अखेर मुलाने आपल्या वृद्ध आईला घराच्या सज्जावर बसविले आणि बाहेरून कुणाची मदत मिळते का म्हणून पंख्याला लटकून आवाज देऊ लागला. परंतु वाढत्या पुरात आणि किर्रअंधारात मदतीची अपेक्षाच नव्हती. इंच इंच पाणी वाढत होते. समोर साक्षात मरण दिसत होते.खासदार सुनील मेंढे यांनी मदतकार्यासाठी दोन बोटी उपलब्ध करून दिल्या. रविवारी दुपारच्या वेळी सिल्ली येथील सुहास गजभिये, मौदी येथील बांते यांनी शिवाजी नगर परिसरात आपल्या बोटीने मदतकार्य सुरु केले. त्यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. जीव धोक्यात घालून हे दोघे घरात शिरले.व्हेंटीलेटरची खिडकी तोडून आत प्रवेश केला. सज्जावर थंडीने कुडकुडत असलेल्या अनुसयाबाई आणि मुलगा राजेश यांना तात्काळ बोटीच्या सहाय्याने बाहेर काढले. आणखी काही काळ उशिर झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. या मायलेकांना जलसमाधी मिळाली असती. मात्र तरुणांच्या धाडसाने या मायलेकांचा जीव वाचला.जीवाची पर्वा न करता अनेकांना काढले बाहेरशिवाजी नगर परिसरात अडकलेल्या नागरिकांना सिल्ली येथील तरुण सुहास गजभिये, विवेक गजभिये, विकास वाहाणे, अश्विन वाहने, राहुल वैद्य, जीतू मेश्राम, तुषार कढव यांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. एक एक करून दिवसभरात नऊ कुटुंबातील ६० ते ६५ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश् आले. स्थानिक तरुणांच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर