शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

जिल्ह्यात आठ रुग्ण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.

ठळक मुद्देनवीन रुग्ण नाही : क्रियाशील रुग्ण २२, रुग्णालयातून मिळाली सुटी, १७५१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. एका रुग्णास यापूर्वीच सुटी देण्यात आला असल्याने सुटी देण्यात आलेल्यांची संख्या ९ झाली आहे. सोमवारी एकही नवीन रुग्ण आढळला नसून जिल्ह्यात क्रियाशील रुग्णांची संख्या २२ वर आली आहे. एकूण बाधित संख्या ३१ आहे.ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.आतापर्यंत १९०८ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी ३१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर १७५१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १२६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.सोमवारी जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये ३३ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३१६ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नर्सिंग होस्टल भंडारा क्वारंटाईन मध्ये १४ व्यक्ती भरती आहेत.तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे ४२५ असे एकूण ४३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये भरती आहेत. ११६९ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.पुणे, मुंबई व इतर राज्यातून ३९४५७ व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून २६६१७ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या १२७४० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी २८ दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.‘ते’ कोरोनामुक्त रुग्ण तुमसरातीलतुमसर : तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबई येथून आलेल्या एका २९ वर्षीय तरूणाला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनाही संस्थात्मक क्वारंटाईन करून घश्याचे नमूने तपासणीसाठी पाठविले होते. त्या सर्वांचेही नमूने निगेटिव्ह आले आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेले हे रुग्ण तुमसर तालुक्यातील आहेत. त्या सर्वांना भंडारा रुग्णालयातून सुटी देत होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस