शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

मका खरेदी केंद्राला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

पर्यायी दुसरे खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने सुरुवातीला खासगी व्यापाºयांनी मातीमोल भावात मका खरेदी करून शेतकऱ्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत पिळवणूक केली. आता सुलतानी संकटाचे ग्रहण आहे. शेतकºयांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी नगदी पिकाकडे वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : मका उघड्यावर पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कोरोनामुळे रोजगार नसल्याने आधीच शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट झाली आहे. मकापीक निघाले व कसेबसे तालुक्यात एकमेव केंद्र सुरू झाले. मका विकून आलेल्या पैशात कोरोनाचे संकट पेलवू असे स्वप्न रंगवत असतानाच बारदाना व गोदामात जागा नाही म्हणून खरेदी बंद झाली. खरेदी केंद्रावर मका उघड्यावर पडून आहे. दररोज सायंकाळी ढग दाटून पावसाची रिपरिप सुरू होते. कोरोना संकटाचा सामना कसा करावा या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली व पीक निघाले. मात्र आधारभूत हमीभाव मका खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाले नाही. खा. प्रफुल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला.त्यानंतर तालुक्यात एकमेव खरेदी केंद्र सुरू झाले. त्याला प्रशासनाच्या व खरेदी केंद्रावरील संचालक मंडळाच्या नियोजनशून्य कार्यप्रणालीची दृष्ट लागली व हे केंद्र अल्पावधीतच बंद पडले.पर्यायी दुसरे खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने सुरुवातीला खासगी व्यापाºयांनी मातीमोल भावात मका खरेदी करून शेतकऱ्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत पिळवणूक केली. आता सुलतानी संकटाचे ग्रहण आहे.शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी नगदी पिकाकडे वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो. विश्वास ठेवून शेतकरी ते करतात. मात्र पीक हातात आल्यानंतर विक्रीसाठी किती यातना भोगाव्या लागतात हे दुखणे ऐकण्यासाठी शेतकऱ्यांकडे कुणीतरी फिरकतो असे आठवत नाही. याऐवजी धानपिक घेतले असते तर आतापर्यंत चुकारे घेऊन नक्की झाले असते असे शेतकºयांचे म्हणणे आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सुमारे ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्रात मका पीक लागवड करण्यात आली. अजूनही बराच मका उघड्यावर आहे. यावर्षी मान्सून वेळेवर झाला व प्रशासनाचे असेच भिजत घोंगडे राहिल्यास शेतकऱ्यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही.याउलट विचार केला तर पीक बदल शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते. मात्र यासाठी प्रशासनाने खंबीरपणे शेतकºयांच्या पाठीशी उभे राहणे अत्यावश्यक असल्याचे आजच्या स्थितीतून दिसून येत आहे.बारदाना व गोदामाची बाधा आहे. वाहतुकीचे नियोजन झाले आहे. उद्या-परवा हा प्रश्न निकाली निघेल. बारदाना कंटेनर केंद्र शासनाकडून येतो. सोमवारी सायंकाळ पर्यंत येणार होतं. येताच पुरवठा करू. त्यानंतर पूर्ववत खरेदी सुरू होईल. या क्षेत्रात पहिल्यांदाच मका लागवड झाली. सुमारे १५ हजार क्विंटल खरेदी होईल. खरेदी पहिल्यांदाच होत असल्याने अडचण येत आहे. या अडचणी पुढच्या खरेदी वेळी येणार नाहीत. शेतकºयांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.-राहुल पाटील, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ कार्यालय नवेगावबांध

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड