शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरातीलच बियाणाचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

भंडारा : येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेले सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन भंडारा ...

भंडारा : येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेले सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारात सद्य:स्थितीत सोयाबीनचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाण्यांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा, असे सांगितले. कोरोना संसर्गाचा फटका सर्वच व्यवसायांना बसल्याने महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल व प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेले सोयाबीन यावर्षी पेरणीसाठी वापरू शकतात. प्रमाणित बियाणाच्या उत्पादनातून प्रतवारी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. मात्र, हे करत असताना योग्य ती काळजी घ्यावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, त्याचे बाह्य आवरण पातळ असल्याने त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घ्यावी. बियाणाची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसल्याची खात्री करावी. तसेच दरवर्षी बियाणाची घरीच साठवणूक करताना प्लास्टिक पोत्यांचा वापर टाळावा, त्याऐवजी गोणपाटाची पोती वापरणे आवश्यक आहे. घरच्याच बियाणाची उगवणशक्ती तपासण्याचे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

बॉक्स

उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असावी

शेतकऱ्यांनी आपल्या घरातील बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी बियाणाची उगवण क्षमता तपासावी. सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ते बियाणे पेरणीयोग्य असते. याशिवाय ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यास सोयाबीनची पेरणी करावी. ही पेरणी करताना दोन ते चार सेंटिमीटर खोलीपर्यंत बियाणे जाईल, याची काळजी घ्यावी. पेरणी अगोदर प्रतिकिलो बियाणाला तीन ग्रॅमची दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाणास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून ते सावलीत वाळवावे. नंतरच त्याची पेरणी करावी. बियाणे हाताळताना बियाण्याची जास्त आदळआपट न करता कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने लागवड करावी.