शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या जंगलात रेतीची डम्पिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST

हरदोली शिवारातील वनविभागाच्या राखीव जागेत रेतीचा अनधिकृत डम्पिंग यार्ड उभारण्यात आला आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे विस्तीर्ण खोरे आहेत. या नदींच्या पात्रातून रेतीची विदर्भासह अन्य राज्यात मोठी मागणी आहे. यामुळे रेतीच्या दरातही चांगलीच वाढ दिसून येते. एकीकडे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असताना अनधिकृतपणे रेतीची साठवणुकही करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपांजरा घाटातून रेतीचा उपसा : हरदोली शिवारातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : विधानसभा निवडणुकीच्या कामात प्रशासन यंत्रणा व्यस्त असल्याचा फायदा घेत सिहोरा परिसरात रेतीमाफीया सक्रीय झाले आहेत. हरदोली शिवारातील वनविभागाच्या राखीव जागेत रेतीचा अनधिकृत डम्पिंग यार्ड उभारण्यात आला आहे.तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे विस्तीर्ण खोरे आहेत. या नदींच्या पात्रातून रेतीची विदर्भासह अन्य राज्यात मोठी मागणी आहे. यामुळे रेतीच्या दरातही चांगलीच वाढ दिसून येते. एकीकडे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असताना अनधिकृतपणे रेतीची साठवणुकही करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवरील कवलेवाडा गावाच्या शेजारी धरणाचे बांधकाम झाल्याने रेती तस्करांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. यामुळे मांडवी गावाच्या शेजारी परसवाडा गावात रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे.धरणाचा उर्ध्व भागात नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने रेतीचा उपसा वाढला आहे. पांजरा घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरु आहे. परंतु या रेतीचा साठा गावाशेजारी न करता रेती माफीयांनी नविन शक्कल लढवित महसुल आणि वनविभागाच्या राखीव जागेत रेतीची साठवणूक केली आहे. हरदोलीचे सहायक वनपरिक्षेत्र कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. हरदोली ते दावेझरी मार्गावर रहदारी करताना सदर डम्पींग यार्ड सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष कसे? याबाबतही चर्चा रंगली आहे. परिणामी रितसर कारवाई होणार तरी कशी?असेही बोलले जात आहे.रेतीची तस्करी दिवसाढवळ्या सुरु असताना हजारो ब्रास रेतीची विक्रीही सुरु आहे.

टॅग्स :forestजंगल