कायदे शिकवू नको, वाट लावून टाकीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:01:05+5:30

सुधीर कुंभरे हे अड्याळ वनविभागांतर्गत किटाडी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. कुंभरे यांनी २० फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी लाकूड भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला. तसेच याबाबतची माहिती त्यांचे वरिष्ठ अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.के. बलखोडे यांना दिली. यात झालेल्या दोघांच्या संभाषणात आरएफओ बेलखोडे यांनी वनरक्षक कुंभरे यांना उपरोक्त विधान केले.

Don't teach the law, I'll wait | कायदे शिकवू नको, वाट लावून टाकीन

कायदे शिकवू नको, वाट लावून टाकीन

googlenewsNext
ठळक मुद्देकोणत्याही प्रकारे गुन्हा नोंद होणार नाही, लक्षात ठेव : वनविभागातील ऑडियो क्लिप झाली सर्वत्र व्हायरल

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘जंगलातील असेल तर मीच सोडणार नाही, मीच ट्रॅक्टर सरकार जमा करणार. शेतातील असेल तर सोडून द्यायचे. मी तुला पाहतो, तुला कोण वाचविते, कायदे शिकवू नको, माझी गोष्ट ऐकत नाही ना, तुझी वाट लावून टाकीन’, हे शब्द आहेत भंडारा जिल्ह्यातील वनविगांतर्गत कार्यरत असलेल्या एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे.
अड्याळ वनविभागांतर्गत येथील वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.के. बेलखोडे यांनी त्यांच्या अधिनस्त असलेले वनरक्षक सुधीर कुंभरे यांच्यासोबत झालेल्या प्रकरणातून पाहून घेण्याच्या ऑडियो क्लिपने सध्या वनविभागासह सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.
वरिष्ठ वनाधिकारी कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी कसा संवाद साधतात ही काही नवीन बाब नाही. मात्र वनविभागातील गौडबंगाल उघडकीस आणणारे व अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने न चालणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसा मनस्ताप सहन करावा लागतो, याची बोलकी प्रचिती व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमधून येते.
सुधीर कुंभरे हे अड्याळ वनविभागांतर्गत किटाडी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. कुंभरे यांनी २० फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी लाकूड भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला. तसेच याबाबतची माहिती त्यांचे वरिष्ठ अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.के. बलखोडे यांना दिली. यात झालेल्या दोघांच्या संभाषणात आरएफओ बेलखोडे यांनी वनरक्षक कुंभरे यांना उपरोक्त विधान केले. तसेच याबाबतीत कोणताही गुन्हा नोंद होणार नाही, असे बजावून जप्त केलेल्या वाहनबाबत प्रसुरी न नोंदविण्याचे कुंभरे यांना सांगितले. यावेळी दम भरल्याचा आरोपही कुंभरे यांनी केला. इतर चार आरोप करीत निलंबन का करण्यात येऊ नये, असा प्रस्तावही उपवनसंरक्षकांना पाठविण्यात आला आहे.
कुंभरे यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपासंदर्भात त्यांनी लेखी स्वरूपात बयानही दिले आहे. यात त्यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्वच आरोपांचे खंडन करीत कागदपत्रांसह पुरावाही वरिष्ठांकडे सादर केला आहे. मात्र वनपरिक्षेत्राधिकारी हेतुपुरस्पर कारवाई करीत असल्याचे कुंभरे यांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाचा ऑडिओ वनविभागातच नव्हे सर्वत्र व्हायरल झाला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. आता वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे वनविभागाचे लक्ष लागले आहे.

असे झाले आरोप-प्रत्यारोप
वनरक्षक सुधीर कुंभरे यांच्यावर पहाडी येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. त्यांनी या समितीची कार्यकारिणी रद्द करून नवीन समिती नियमबाह्यपणे गठित केली, असा आरोप आहे. तसेच वनव्यवस्थापन समिती व तथा ग्रामवन समिती यांच्याकडील सरकारी खात्यात अखर्चित शिल्लक निधीबाबत माहिती सादर केली नाही, असाही ठपका आहे. गुरढा येथे डीप सीसीटी कामावर रोपे लावण्याबाबत सूचना देण्यात आली होती. यातही कामे वेळीच केली नाही, असा ठपका ठेवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मी काहीही केलेले नाही. या प्रकरणाबाबत माहिती नाही. मला काहीच बोलायचे नाही.
-व्ही.के. बलखोडे, वनपरिक्षेत्राधिकारी, अड्याळ.

Web Title: Don't teach the law, I'll wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.