शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा क्षेत्राकरिता आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:45 IST

शैक्षणिक, सामाजिक विकासाबरोबरच शारीरिक विकास अत्यंत आवश्यक आहे. क्रीडापटूंना त्यांची सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्राकरिता आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.

ठळक मुद्देचरण वाघमारे : अटलबिहरी वाजपेयी क्रीडा संकुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शैक्षणिक, सामाजिक विकासाबरोबरच शारीरिक विकास अत्यंत आवश्यक आहे. क्रीडापटूंना त्यांची सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्राकरिता आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.भारतरत्न अटलबिहरी वाजपेयी क्रीडा संकुलाचे लोकार्पणप्रसंगी तुमसर येथे ते बोलत होते. लोकार्पणप्रसंगी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, आमदार परिणय फुके, कृउबास सभापती भाऊराव तुमसरे, सभापती रोशना नारनवरे, राजेश पटले, पल्लवी कटरे, अनील जिभकाटे, मेहताबसिंग ठाकुर, गीता कोंडेवार, मुन्ना पुंडे, राणी ढेंगे, ललीत शुक्ला, पंकज बालपांडे, राजाभाऊ लांजेवार व नगरसेवक उपस्थित होते. क्रीडा संकुलाचे बांधकामाकरिता शासनाकडून एक कोटीचे प्रस्तावास मान्यता मिळाल्याने, क्रीडासंकुलाचे बांधकाम तात्काळ करून हा परिसर खेळाडू क्रीडाप्रेमींना उपलब्ध करण्याचा सातत्याने पाठपुराव्यामुळे उपलब्ध करून देण्यात आला व यास भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण तारिक कुरैशी सभापती म्हाडा नागपूर विभाग यांचे अध्यक्षतेखाली आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार चरण वाघमारे यांनी आपले मार्गदर्शनातून या क्रीडा संकुलाचे बांधकाम करताना अनेक अडचणी आल्या व त्यामुळे या इमारतींचे बांधकाम करण्यास विलंब जरी झाले असेल तरी मात्र यात सातत्याने प्रयत्न झाले आहे. संकुलाचा तुमसर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.