शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी केली रोहयो कामाची पाहणी

By admin | Updated: June 9, 2015 00:50 IST

वादळाने झालेले नुकसान, रोहयोची कामे, शतकोटी वृक्ष लागवड व चिचाळ येथे मत्स्यबिज केंद्राची पाहणी करून ...

लाखांदूर : वादळाने झालेले नुकसान, रोहयोची कामे, शतकोटी वृक्ष लागवड व चिचाळ येथे मत्स्यबिज केंद्राची पाहणी करून जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले.जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केलेल्या विकास कामाची प्रत्यक्ष अर्धा कि.मी. पायी चालून पाहणी केली. सोनी, इंदोरा येथील भातखाचरे कामाची पाहणी केली. तसेच पं.स. अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शतकोटी योजनेंतर्गत चप्राड पहाडीयेथील वृक्ष लागवडीची पाहणी केली. तालुक्यातील विकास कामाचा आढावा घेत केलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. तसेच पं.स. अंतर्गत चिचाळ / बारव्हा येथील मत्स्यबीज केंद्राची सुद्धा पाहणी केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. कंत्राटी पॅनल अधिकाऱ्यांना मात्र बेशीस्तीचे वर्तनाबद्दल चांगलेच धारेवर धरले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा पहिलाच दौरा अनेकांची दमछाक करणारा ठरला असला तरीपण प्रशासकीय कामासंदर्भात हयगय ठरणाऱ्यांसाठी चांगलाच चपराक बसणारा ठरला. तालुक्यातील इतर अनेक ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) पडोळे, उपविभागीय अधिकारी डी.पी. तलमले, तहसीलदार विजय पवार, खंडविकास अधिकारी विजय झिंगरे व सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)