शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

डंका निर्मलग्रामचा ; गावात मात्र अस्वच्छता

By admin | Updated: November 11, 2014 22:34 IST

शासनाद्वारे गाव स्वच्छ बनविण्यासाठी प्रती वर्ष अरबो रुपये खर्च केले जात आहेत. तथापि वास्तविकता विपरीत आहे. जी गाव निर्मल झाली. ती गाव कागदावर नावारुपाला आली आहेत.

राजू बांते - मोहाडीशासनाद्वारे गाव स्वच्छ बनविण्यासाठी प्रती वर्ष अरबो रुपये खर्च केले जात आहेत. तथापि वास्तविकता विपरीत आहे. जी गाव निर्मल झाली. ती गाव कागदावर नावारुपाला आली आहेत. गावात प्रवेश करताना अशा निर्मल गावांची अनुभूती यायला लागते.निर्मल गाव कशाला म्हणायचे या बाबीवर एक नजर घातली तर गावांना निर्मल ग्राम कसे पुरस्कार दिले गेले याचे आश्चर्य वाटायला नक्कीच लागेल. गावाला निर्मल गावाचा दर्जा देताना, सार्वजनिक ठिकाण शौचरहित असावे, सर्व कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा असावी, सर्व शाळांमध्ये मुला- मुलींसाठी वेगवेगळे शौचालय व मुत्रालय असावे, आंगणवाडी केंद्रात बालकांच्या उपयोगासाठी शौचालय असावे, शौचालयाचा नियमित उपयोग केला जावा, गावात पर्यावरण स्वच्छता हवी, गावात शंभर टक्के शौचालय असावेत व स्वच्छ पिण्याची पाणी उपलब्ध झाले या अटीवर निर्मलग्राम करण्यात आले. तथापि मोहाडी तालुक्यातील ७७ गावाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता निर्मल झालेली व न झालेल्या गावात शौचालयाची कमतरता असल्याचे दिसून येते. आज निर्मल ग्राम योजनेला आठ वर्षाचा काळ झाला असताना अजूनही वास्तविकतेच्या आधारावर एकही निर्मल गाव असल्याचे कुठेच दिसून येत नाही. पुरस्कारावर शासनाचा लाखो अरबो रुपया वाया गेला. गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणले. गाव खेड्यात गावातील रस्त्यावर मानवी विष्ठेची दुर्गंधी नेहमीच दिसून येते. गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानही गावात कागदावर राबविला जातो. केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १४ नोव्हेंबर बालक दिन ते १९ नोव्हेंबर जागतिक स्वच्छता गृह दिन राबविली जाणार आहे. या मोहीमेच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून स्वच्छ भारत हे ध्येय १०१९ पर्यंत साध्य करायचे आहे. ही मोहीम केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे. कामकाज न करणाऱ्या व आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ येणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मोहाडी तालुक्यातील ७७ गावांपैकी ५३ गावे निर्मलग्राम झाली आहेत. २०१२ च्या सर्व्हेक्षणानुसार ५३ निर्मल गावात २३,६८४ घरे आहेत. त्यात आजही १० हजार ८८ घरी शौचालय नाहीत. २३ हजार ६८४ घरापैकी १३ हजार ५९६ घरी शौचालयाची व्यवस्था आहे. अजूनही २४ गावे निर्मलग्राम होण्याची प्रतिक्षा बघत आहेत. निर्मलग्राम न झालेल्या २४ गावात ४ हजार ६८९ शौचालय आहेत. अजूनही ९ हजार ९११ कुटुंबापैकी ५ हजार २२२ घरी शौचायल नसल्याची आकडेवारी आहे. जिल्हा परिषद शाळांचेही तेच हाल आहेत. नव्याने ६१ स्वच्छतागृहे बांधायची आहेत. यात पुन्हा २२ स्वच्छतागृहाची दुरुस्ती करायची आहे. जिल्हा परिषद शाळांची संख्या १०७ आहे. या १०७ शाळांमध्ये २३६ स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये परिचर पद नाही. त्यामुळे स्वच्छता करण्याचे काम विद्यार्थ्यांकडून केले जातात. काही शाळा मुख्याध्यापक शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांकडून झाडझूड करून घेतात. बऱ्याच प्राथमिक शाळात पाणी भरण्याचेही काम विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. बालकांकडून संस्कार मुल्यांच्या जोपासण्याच्या नावाखाली वर्षभर झाडझूड, पाणी भरण्याचे कार्य करणे योग्य नाही अशी पालकांची ओरड आहे.