शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण घरांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST

ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे.

ठळक मुद्देसिहोरा परिसरातील घरे : ग्रामपंचायती पुढाकार घेणार काय?

रंजीत चिंचखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : ऐन पावसाळ्यात अतिवृष्टी सुरू असल्याने जीर्ण घराचे भिंती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता आहे. डोंगरला गावात जीर्ण घराची भींत अपघाताला आमंत्रण देत असल्याने ग्रामपंचायतीनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात असणारे त्यांचे घर आता देखभाल आणि दुरूस्ती करण्यात येत नसल्याने दुर्लक्षित झाले आहे. माती आणि कवेलूचे असणारी घरे गावकऱ्यांच्या जीवावर बेतणारी झाली आहे. सिहोरा परिसरातील गावात असे चित्र प्रत्येक गावात असल्याचे दिसून येत आहेत.
दरवर्षी पावसाचे पाण्यामुळे भींती जीर्ण झाली आहेत. या भिंती कधी कोसळतील याचा नेम नाही. या घरांशेजारी गावातील बालके खेळताना दिसून येत आहे. काही गावात जीर्ण भिंती कोसळल्याने बालकांचा बळी गेला आहे. परंतु गावात जीर्ण घराचे भिंती भुईसपाट करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत या गंभीर समस्येवर विचारमंथन करण्यात आले नाही. गावातील महत्वपूर्ण सभेत सदर विषय चर्चेत घेण्यात येत नाही. यामुळे गावात अशा जिवघेण्या घरांच्या भिंती उभ्या आहेत. घरमालक कधी गावात परतत नाही. घटनेची जबाबदारी स्विकारत नाही. यामुळे गावातील नागरिकांच्या जिवाची सुरक्षा करण्यासाठी सर्वेक्षणानुसार आधी नोटीस देवून सूचना देण्याची आवश्यकता आहे. जीर्ण घर आणि भिंतीच्या समस्यावर शहरात नगरपालिकामार्फत कारवाई तथा सूचना देण्यात येत आहे. परंतु अशी जागरूकता गावात दिसून येत नाही.
जीर्ण भिंतीवरून ग्रामपंचायत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. राज्यमार्गावरील डोंगरला गावात तुमसर येथील जायस्वाल नामक घर खरेदी केले आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असणाºया या घराची भिंत जीर्ण झाली आहे. याच घराचे शेजारी लहान मुळे खेळत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. भिंतीला भेगा पडल्या असल्याने वर्दळीच्या मार्गावर कोसळण्याची शक्यता आहे.

तुमसर तालुक्यातील प्रत्येक गावात जीर्ण आणि ओसाड भिंती उभ्या आहेत. या भिंती लहान बालकांच्या जीवावर बेतणाºया आहेत. डोंगरलातील घरांची भिंत धोकादायक असल्याने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
-शंकर राऊत, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, तुमसर.

टॅग्स :Rainपाऊस