वारपिंडकेपार येथे शासकीय बांधकामाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:01:08+5:30

वारपिंडकेपार येथील एका इसमाने बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह, हातपंप, सिमेंट रस्ता बांधकामाची तोडफोड करायला सुरुवात केली. काही गावकऱ्यांनी बांधकामाची तोडफोड होत असताना पाहिल्याने तोडफोड करणाऱ्या इसमाला समजविण्याचा प्रयत्न केला.

 Demolition of government building at Warpindkepar | वारपिंडकेपार येथे शासकीय बांधकामाची तोडफोड

वारपिंडकेपार येथे शासकीय बांधकामाची तोडफोड

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांकडून जेसीबी मशीन जप्त : ठाणेदारांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार येथे एका इसमाने शासकीय बांधकामाची तोडफोड करून बांधकामाची जागा स्वत:ची असल्याचा दावा केला.
वारपिंडकेपार येथील एका इसमाने बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह, हातपंप, सिमेंट रस्ता बांधकामाची तोडफोड करायला सुरुवात केली. काही गावकऱ्यांनी बांधकामाची तोडफोड होत असताना पाहिल्याने तोडफोड करणाऱ्या इसमाला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो इसम कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने गावकऱ्यांनी एकत्र येत समजवण्याचा प्रयत्न केला. रोहयो कामावरील मजुरांना एकत्र येत बांधकाम थांबविण्याचा प्रयत्न केला. वारपिंडकेपार हे दीड हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथील गावकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक ग्रामपंचायततर्फे बांधकाम करण्यात आली आहेत. मात्र बांधकाम आपल्या जागेवर झाले असल्याचा आरोप करीत गावातीलच एका व्यक्तीने बांधकामाची तोडफोड सुरुच ठेवली. ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबतची कोणतीही पूर्व सूचना न देता जेसीबीच्या सहाय्याने थेट बांधकाम तोडफोड करीत असल्याने गावातील सरपंच बबीता पटले व उपसरपंच रमेश तोरणकर यांनी पोलिसांना माहिती दिली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र पोलीस येण्यापूर्वी गावकºयांमध्ये आणि बांधकामाची तोडफोड करणाºया इसमामध्ये शाब्दीक चकमक उडाली. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. शासकीय बांधकामाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीसांनी जेसीबी मशीन ताब्यात घेतली आहे. वाढता तणाव लक्षात घेता ठाणेदार देवेंद्र ठाकुर यांनी वेळीच घटनास्थळी पाहणी करून पुढील चौकशीची गावकºयांना ग्वाही दिली.
गत २० वर्षापासून शासकीय जागेवर बांधकाम असताना आजपर्यंत कोणताही दावा न करता किंवा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न दाखवता इसमाने बांधकामाची तोडफोड केल्याची तक्रार ग्रामपंचायतने दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

गेल्या २० वर्षापासून या जागेवर शासकीय बांधकाम असताना कधीही कोणाकडून विरोध करण्यात आला नाही. ग्रामपंचायतला पूर्व सूचना न देता बांधकामाची तोडफोड केल्याप्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे.
-जितू पटले, ग्रामपंचायत सदस्य, वारपिंडकेपार.

Web Title:  Demolition of government building at Warpindkepar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस