शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
4
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
5
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
6
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
7
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
8
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
9
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
10
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
11
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
12
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
13
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
14
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
15
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
16
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
17
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
18
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
19
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
20
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल लाभार्थ्यांसाठी रेतीघाट सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

पवनी तालुक्यातील रेतीघाट गत काही दिवसापासून बंद असल्याने घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरच आपले वास्तव्य करावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासन त्वरीत बांधकाम करा, असा तगादा लावत असल्याने घरकुल लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : पवनी तालुका शिवसेनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पालोरा : पवनी तालुक्यातील रेतीघाट गत काही दिवसापासून बंद असल्याने घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरच आपले वास्तव्य करावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासन त्वरीत बांधकाम करा, असा तगादा लावत असल्याने घरकुल लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे. यावर प्रशासनानेच तात्काळ तोडगा काढावा व घरकुल लाभार्थ्यांकरिता रेतीघाट खुले करावेत, अशी मागणी शिवसेना विधानसभा प्रमुख बालु फुलबांधे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी पवनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पवनी पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील विविध लाभार्थ्यांना घरकुले मंजुर झाले आहेत. मात्र रेतीच्या अभावामुळे अनेक घरकुल बांधकामे गेल्या काही दिवसापासून ठप्प आहेत. अतिरिक्त पैसे मोजून रेती विकत घेणे गोर, गरीबांना शक्य होत नसल्याने बांधकामे अर्धवट स्थितीत आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलाची काही रक्कम देखील जमा झाली आहे. मात्र रेतीच्या अभावामुळे घरकुलाचे बांधकाम करता येत नसल्याने बांधकाम पूर्ण करण्यात अडचणी येत आहे. सध्या रेतीच्या तुटवड्यामध्ये ग्रामीण भागात रेतीचे दर हे गगनाला भिडले आहेत. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत दिली होती. मागीलवर्षी ईटगाव रेतीघाटातून लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा केला जात होता.मात्र यावर्षी रेतीघाटात पाणी असल्याने रेती काढणे अशक्य होत आहे. परिणामी अनेक घरकुलांची बांधकामे ठप्प झाल्याने रेतीघाट त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत मेश्राम तसेच तालुक्यातील शिवसैनिकांनी निवेदनातून केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा आहे.

टॅग्स :Socialसामाजिक