शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेअर्सच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांची फसवणूक

By admin | Updated: February 26, 2016 00:46 IST

आजच्या युगात मोठमोठी स्वप्ने दाखवून पैसे लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू आहे, अशी बरीच प्रकरणे उघडकीस आली असली तरी पैशाच्या लोभात अनेकजा या चक्रव्यूहात अडकले.

साकोली येथील घटना : पोलिसात तक्रार नाहीसंजय साठवणे साकोली आजच्या युगात मोठमोठी स्वप्ने दाखवून पैसे लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू आहे, अशी बरीच प्रकरणे उघडकीस आली असली तरी पैशाच्या लोभात अनेकजा या चक्रव्यूहात अडकले. असा प्रकार साकोलीतही घडला आहे. शेअर्सच्या नावाखाली जवळपास २० ते २५ कोटी रूपयांची उलाढाल झाली असून पैसे घेणारा इसम सध्या 'आऊट आॅफ कव्हरेज' आहे. दुसरीकडे पैसे देणारे मात्र गप्प आहेत. एवढे होऊनही या प्रकरणाची कुणीही पोलिसात तक्रार दिली नाही, हे विशेष.मागील एक वर्षापासून साकोली येथे एक इसम शेअर्सच्या नावाखाली लोकाकडून लाखो रूपये जमा करीत होता. एका लाखाच्या शेअर्सला महिन्याकाठी तो ८ ते १० हजार रूपयेही दरमहिन्याला देत होता. हा प्रकार पाहुन अनेकांना पैशाचा मोह सुटला. बऱ्याच लोकांनी स्वत:हुन त्या इसमाकडे स्वत:हुन पैसे नेऊन दिले. यात डॉक्टर, कंत्राटदार, शिक्षक यासह अनेकांनी पैसे दिले. ही रक्कम जवळपास २० ते २५ कोटी रूपयाच्या घरात असल्याचीही चर्चा आहे. काही महिने या इसमाने या पैशाच्या शेअर्सचा नफा म्हणून आठ ते दहा हजार रूपये ईमाने इतबारे परत केले. मात्र दोन तीन महिन्यापूर्वी पासून मात्र त्याने पैसे देणे बंद केले.त्यामुळे शेअर्सच्या नावाखाली आपली फसगत झाल्याचे लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या पैसे घेणाऱ्याची शोधाशोध सुरू केली. मात्र तोपर्यंत तो साकोली येथून फरार झाला होता. नंतर तो पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. लोकांनी त्याला तिथून पकडून आणले. त्याला मारहाण केली. मात्र त्याने पैसे परत केले नाही. त्यामुळे लोकांनी त्याची पोलिसात तक्रार न देताच सोडून दिले. त्यानंतर हा ठग इसम पुन्हा पुण्याला पळून गेल्याची माहिती आहे.धनादेश देत होताज्या ज्या लोकांनी शेअर्सच्या नावाखाली पैसे दिले त्या त्या सर्वजणांना त्याने शेअर्सची कुठलीही कागदपत्रे न देता तेवढ्याच रूपयाचे धनादेश देत होता. त्यामुळे सुरवातीपासून हा इसम लोकांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट होत होते. तरीही लोक मूर्खासारखे त्याला पैसे देऊन आपली स्वत:ची फसगत करीत होते.पुण्यावरून आणणारे ते कोण?सदर इसमाला साकोली येथील तीन ते चार इसमांनू पुण्यावरून साकोली येथे मारहाण करीत आणले. मात्र त्याची पोलिसात तक्रार न देता सोडून दिले या दरम्यान त्याच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची व त्याला पुण्यवरून आणणारे ते इसम कोण याची चौकशी झाली पाहिजे.पोलिसात तक्रार का नाहीसदर प्रकरण अनेकांनी प्रत्येकी १० ते १५ लक्ष रूपयाची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. गुंतवणूक करणारे कोण, गुंतवणूक करणाऱ्याजवळ इतके पैसे आले कुठून व फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार का दिली नाही. हाही संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे हे नक्कीच काळा पैसा असल्याचे स्पष्ट होते.पोलिसांनी चौकशी करावीसदर प्रकरण साकोली परिसरातील मोठे प्रकरण असून या प्रकरणात कोट्यावधी रूपयाचा व्यवहार झाला आहे. या प्रकरणात परिसरातील मोठमोठे नामांकित व्यक्ती गुंतलेले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नागरिकांच्या मागणीवरून या प्रकरणाची चौकशी करावी व आरोपी या शोध घ्यावा व कुठलीही शहानिशा न करता या प्रकरणात गुंतवणूक करणाऱ्यांनाही कार्यवाहीची मागणी आहे.