शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या बेजबाबदार धोरणाने देश संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून शासनाने कुठलेही नियोजन केले नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीला घेवून काँग्रेसच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील तालुक्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल गुडघे : काँग्रेस करणार ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अर्थव्यवस्था दिवसेदिवस खालावत आहे. रोजगार निर्मिती ठप्प झाली असून महागाई गगणाला भिडली आहे. भाजप सरकारच्या अशा बेजाबदार कारभारामुळेच देश संकटात सापडला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या अपयशी व नाकर्तेपणाच्या विरोधात काँग्रेस ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी दिली.येथील विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश सचिव मुजीब पठाण, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रमोद तितीरमारे, मधुकर लिचडे, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष सीमा भुरे, प्रभू मोहतुरे, महेंद्र निंबार्ते, राजकपूर राऊत, शंकर तेलमासरे, माणिकराव ब्राम्हणकर, विकास राऊत, होमराज कापगते, डॉ. विनोद भोयर, प्रेम वनवे, मनोहर उरकुडकर, जयश्री बोरकर, रणवीर भगत, धनराज साठवणे आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून शासनाने कुठलेही नियोजन केले नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीला घेवून काँग्रेसच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील तालुक्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यात ६ नोव्हेंबरला साकोली, ७ नोव्हेंबरला पवनी, लाखनी व मोहाडी तर ८ नोव्हेंबरला लाखांदूर, तुमसर आणि ९ नोव्हेंबरला भंडारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगगितले. जिल्हा केंद्रात आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान सेलचे अध्यक्ष आमदार नाना पटोले करणार आहेत. तर तालुक्याच्या ठिकाणी तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आंदोलनात या मागण्यांचा समावेशजिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावे, खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे, वाढती महागाईवर अंकुश घालणे, उद्ध्वस्त झालेली बँकींग व्यवस्थेला हातभार लावणे, शेती व जिल्हा तसेच तालुका पातळीवरील समस्यांचे निराकरण करणे आदी मागण्यांचा या ठिय्या आंदोलनात समावेश असणार आहे. या आंदोलनात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेसचे प्रदेश, जिल्हा व कार्यकारिणीचे सदस्य या शिवाय महिला काँग्रेस पदाधिकारी, सेवादल, युवक काँग्रेस व अन्य सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस