जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे अर्धशतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:32+5:30

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहे. त्यापैकी १४०० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाने मृत्यूची संख्याही वाढत आहे. भंडारा तालुक्यात आतापर्यंत ३५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.

Corona crosses half-century of death in district | जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे अर्धशतक पार

जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे अर्धशतक पार

ठळक मुद्देमृतांची संख्या पोहचली ५१ वर । सर्वाधिक ३५ मृत्यू भंडारा तालुक्यातील

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुरूवातीला कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात आता रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५१ व्यक्ततींचा मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यातील आहे. विशेष म्हणजे आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातच मृत्यूचा आकडा वाढला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहे. त्यापैकी १४०० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाने मृत्यूची संख्याही वाढत आहे. भंडारा तालुक्यात आतापर्यंत ३५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. तर तुमसर आणि मोहाडी तालुक्यात प्रत्येकी सहा, पवनी तालुक्यात दोन आणि लाखनी व साकोली तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी जिल्ह्यात ९४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील ६६ व्यक्तींचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात आतापर्यंत १३३९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. साकोली, लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी दोन, तुमसर आठ, मोहाडी सहा, पवनी तीन, लाखनी सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. विविध उपाययोजनेंतही रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे.

अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीडद्वारे जिल्ह्यात आतापर्यंत २०७६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १८ हजार १९३ व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी करण्यात आली आहे. अगदी कमी वेळात कोरोना रुग्णासंदर्भात या टेस्टद्वारे माहिती मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ४६२ व्यक्तींचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २६९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. शनिवारी १५३ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आतापर्यंत १४०० व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात १२४७ रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्ह्यात सर्वेक्षणाचे कामही केले जात आहे.

Web Title: Corona crosses half-century of death in district