रेतीघाटांच्या लिलावाअभावी बांधकाम मजूर संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंडउमरी : भंडारा जिल्ह्यात अनेक रेतीघाट असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका बांधकाम मजुरांना सोसावा लागत ...

Construction labor in crisis due to sand auction | रेतीघाटांच्या लिलावाअभावी बांधकाम मजूर संकटात

रेतीघाटांच्या लिलावाअभावी बांधकाम मजूर संकटात

Next
ठळक मुद्देबेरोजगारीत वाढ : प्रशासनाचे दुर्लक्ष, बांधकाम रखडले




लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडउमरी : भंडारा जिल्ह्यात अनेक रेतीघाट असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका बांधकाम मजुरांना सोसावा लागत आहे. साकोली तालुक्यात अनेक ठिकाणी रेतीघाट उपलब्ध आहेत. मात्र प्रशासनाकडून रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया झालेली नसल्याने अनेक ठिकाणी रेतीघाट सुरू नाहीत. याचा परिणाम ग्रामीण भागात रेती मिळणे कठीण झाले आहे.
बांधकाम व्यवसायावर उतरती कळा आली आहे. रेती मिळत नसल्याने साकोली तालुक्यातील परसोडी-पिपरी रस्त्याचे बांधकाम श्याम अग्रवाल यांनी स्व:खर्चातून मुरूम गिट्टी टाकून ट्रॅक्टरच्या सहायाने सर्वसामान्यासाठी काम करून घेतले. लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे बांधकाम झाले नाही. रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प पडला आहे. अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने रेतीची वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. मात्र अनेक कारणांनी बंद असलेल्या रेतीघाटांचा ग्रामीण भागातील बांधकाम व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. तालुक्यातील मºहेघाट, उमरीघाट, वहेटेकर, महालगाव, पोवारटोली, पिपरी, चुलबंद नदीपात्रातील रेतीघाट प्रसिद्ध आहे. या रेतीला तालुक्यातच नव्हे जिल्हा बाहेर मोठी मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात मजुरांना काम मिळत होते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाने लिलाव प्रक्रिया झालेली नाही. याचा विपरीत परिणाम बांधकाम व्यवसायावर होत आहे. काही ठिकाणी तलाठी, मंडळ अधिकारी प्रती ट्रॅक्टरमागे पैशांची मागणी करीत असल्याने ट्रॅक्टर मालकही अडचणीत आले आहे. साकोली तालुक्यातील घरकुल बांधकाम देखील अडचणीत आली आहे. घरकुल बांधकामासाठी शासनाने रेती उपलब्ध करून देण्याची आदेश दिले असले तरी याची सर्वत्र अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिसरातील रेतीघाट सुरू करावी, अशी मागणी तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
 

Web Title: Construction labor in crisis due to sand auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू