शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळयात बंद होणाऱ्या मार्गाची माहिती तयार करुन पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। भंडारा येथे मान्सून पूर्वतयारी आढावा, रस्ते व पुलाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट भागातील गावातील लोकांना संभाव्य धोक्याची जाणीव करुन देण्यासोबतच पूल व रस्त्यांचे दुरुस्तीची कामे पावसाळयापूर्वी आटोपावे. जलसंपदा विभागाने पूर निवारण यंत्रणा तसेच विद्युत व पोलीस यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.
भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळयात बंद होणाऱ्या मार्गाची माहिती तयार करुन पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. या कामासाठी निधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी धोकादायक इमारतीत राहू नये, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मॉकड्रिल व कर्मचाऱ्याना प्रशिक्षणाचे आयोजन एका दिवशी दोन तालुके या प्रमाणे तात्काळ करावे. होमगार्ड व नाविकांची यादी तयार करुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राहत शिबिराचे नियोजन करावे. सर्व तहसीलदारांनी ग्रामदक्षता समितीची सभा घेवून पुरपरिस्थितीबाबत चर्चा करावी व ग्रामस्थांना अवगत करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींना दरमहा पाच किलो तांदुळ व कुटूंबास एक किलो चना देण्याचे १९ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार देय आहे. उद्योग, कामगार, पोलीस, नगर परिषद व पंचायतीच्या प्रतिनिधींनी लाभार्थ्यांची यादी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे सादर करुन त्यासाठी केंद्र प्रमुखांची नियुक्ती करावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या.आतापासून तयारी व मॉकड्रिलचे आयोजन करुन नदीकाठावरील पुरबाधित गावावर लक्ष केंद्रीत करा. कोणतीही अनुचित घटना घडून वित्त व मनुष्यहानी होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुरामुळे दुषित पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा विभागाने निर्जंतुकीकरण व्यवस्था तयार ठेवावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मान्सून पूर्वतयारी बाबत प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी सादरीकरणाद्वारे आपल्या विभागाच्या कामाची माहिती दिली. यावेळी जलसंपदा, तहसिल, नगरपालिका, नगरपचायत, बांधकाम विभाग, आरोग्य, पोलीस, विद्युत विभाग, राज्य परिवहन विभाग, गोसीखुर्द प्रकल्प, पुरवठा विभाग, आदी विभागाचा आढावा घेण्यात आला. तसेच टोळधाड जनजागृती बाबत कृषी विभागाद्वारे माहिती देण्यात आली.

टॅग्स :Socialसामाजिक