शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा परिसरातील मुख्य रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

कोरोना व्हायरसच्या रुग्ण संख्येत देशभरात वाढ होत आहे. गोंदिया जिल्हयात कोरोना व्हायरसचा पॉजीटिव्ह रुग्ण आढळल्याने सिमावर्ती गावात नागरिकांत भिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:ला सुरक्षीत करण्यासाठी टोकाचे निर्णय घेतला आहे. बपेरा आंतरराज्यीय सिमा, सोंड्याटोला धरण मार्ग आणि कवलेवाडा धरण मार्ग प्रशासनाने सिल केले आहे. यामुळे नागरिकांचे आवागमन थांबले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका : अनोळखी नागरिकांसाठी गावबंदीचा निर्णय

रंजीत चिचखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : मध्यप्रदेश राज्याच्या सिमेलगत असणाऱ्या सिहोरा परिसरातील गावांचे आंतरराज्यीय, जिल्हा सिमा प्रशासनाने बंद केल्या आहेत. तर गावकऱ्यांनी एक पाऊ ल पुढे ठेवत गावातील मुख्य रस्ते सिल केली आहेत. याशिवाय परतणाºया लोकांवर पाऊ ल ठेवण्यात येत आहेत.
कोरोना व्हायरसच्या रुग्ण संख्येत देशभरात वाढ होत आहे. गोंदिया जिल्हयात कोरोना व्हायरसचा पॉजीटिव्ह रुग्ण आढळल्याने सिमावर्ती गावात नागरिकांत भिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:ला सुरक्षीत करण्यासाठी टोकाचे निर्णय घेतला आहे. बपेरा आंतरराज्यीय सिमा, सोंड्याटोला धरण मार्ग आणि कवलेवाडा धरण मार्ग प्रशासनाने सिल केले आहे. यामुळे नागरिकांचे आवागमन थांबले आहे. याशिवाय सिमावर्ती गावात नागपूर, पुणे, मुंबई आणि परदेशातून नागरिक गावांकडे परत येत आहेत. मध्यप्रदेश राज्याच्या सिमेलगत अनेक गावे आहेत. बावनथडी नदीचे पात्र आटले असल्याने या पात्रातून सिमावर्ती गावात नागरिक येण्याचा प्रयत्न करित आहेत. यामुळे वारपिंडकेपार गावातील नागरिकांनी मुख्य रस्ता बंद केला आहे. अन्य शहरातून परतणाऱ्या नागरिकांना गावबंदी करण्याचे फलक लावण्यात आले आहेत. देवरी (देव) येथील गावकºयांनी गावाचे तिन रस्ते सिल केली आहेत. या परिसरातील बपेरा, देवसर्रा गावात अन्य शहरातून नागरिक गावात परतली आहेत. यात परदेशातील लोकांचा समावेश आहे. विमान वाहतुकीने गावात परतणाºया नागरिकांना कॉरनटाईन करण्यात आले असतांना ते गावात फिरतांना आढळले आहेत. त्यांची सुचना पोलीसांना गावकºयांनी दिल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गावात अन्य शहरातून दाखल होणाऱ्या नागरिकांना सशंयीत नजरेने पाहत आहेत. बपेरा गावात मुंबईहून परतणाºया नागरिकांना परत पाठविण्यात आल्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकांनी नाराजी व्यक्त केल्याची गावकºयांनी माहिती दिली आहे. गावात कोरोना व्हायरसची भिती नागरिकांत असली तरी शेत शिवारात शेतकरी बिनधास्त कामे करित आहेत. तरुण वर्ग मैदानात क्रिकेटचा आनंद घेतांना दिसून येत आहेत. या परिसरात कोरोना व्हायरसचा फिलगुड असल्याचे दिसून येत आहे.

आठवडी बाजारात दुकानदारांना निर्देश
शनिवार दिनी सिहोरा गावात आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना निर्देश देण्यात आले आहेत.विक्रेत्यांनी १० फुट अंतरावर दुकाने थाटली आहे. ग्राहकांना सुचना देण्यात आल्या असून अंतराचे पालन करण्याचे बजविण्यात आले आहेत. याशिवाय गावातही थेट भाजी विक्रेते पोहचत आहेत. यामुळे गर्दी टाळली जात आहे.

मजुरांना नास्ता वितरित
कोरोना व्हायरसने रोजगार हिरावल्यानंतर मध्यप्रदेशातील मजूर सिहोरा मार्गे गावात परतण्याकरिता पायदळ प्रवास करित आहेत. नागपुरहून रात्री ३ वाजताच्या सुमारास काही मजूर निघाली आहेत. सिहोरा गावात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे नास्ता आणि पिण्याचे पाणी आदीची सोय केली आह. चुल्हाड गावातही अशीच सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस