शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चितळ मृत्यू प्रकरणाची चौकशी आजपासून

By admin | Updated: February 27, 2017 00:27 IST

कोका वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या इंजेवाडा शेतशिवारात मृतावस्थेत आढळून आलेल्या चितळाच्या शिकार प्रकरणाच्या चौकशीचे सीसीएफचे आदेश ....

प्रकरण इंजेवाडा येथील : मोठे मासे गळाला लागण्याच्या चर्चेला उधाणभंडारा : कोका वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या इंजेवाडा शेतशिवारात मृतावस्थेत आढळून आलेल्या चितळाच्या शिकार प्रकरणाच्या चौकशीचे सीसीएफचे आदेश साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक मनोहर गोखले यांना प्राप्त झाले असून याची चौकशी काल सोमवारपासून (२७ फेब्रुवारी) प्रारंभ होत आहेमृत व्यक्तींच्या नावावर रक्कम लाटल्याचे प्रकरणासह अन्य कारणामुळे सध्या वनविभाग चर्चेत असतानाच १४ फेबु्रवारीला दुसरे अन्य प्रकरण उघडकिला आले. दुसरीकडे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी मात्र दोषींना ‘क्लीन चीट’ देण्याचा सपाटा सुरू केला आहे. १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास कोका वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इंजेवाडा येथील शेतशिवारात मादा चितळाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. १५ फेबु्रवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, हे प्रकरण येथेच दाबण्यासाठी चितळाला धोटे नामक शेतकऱ्याच्या शेतात पुरण्यात आले. शेतात खड्डा करण्यासाठी कोका विश्रामगृहावरून वनमजुरांना बोलविण्यात आले होते. वनमजुरांच्या हातानेच त्याला पुरण्यात आले. दरम्यान, या घटनेची तक्रार करडी येथील राजू तुमसरे व इंजेवाडा येथील वन्यजीव प्रेमींनी दुरध्वनी संदेशाव्दारे वरिष्ठांकडे केल्यानंतर हादरलेल्या वनकर्मचाऱ्यांनी १६ फेबु्रवारीला शेतात पुरलेला चितळाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर हातझाडे यांच्या ट्रॅक्टरमध्ये मृत चितळाला घालून त्याला कोका विश्रामगृहात आणण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. मृत चितळाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही, अशी माहिती आहे. परंतु, शवविच्छेदन केल्याचे प्रमाणपत्र वन विभागाकडे आहे. त्यामुळे ते प्रमाणपत्र बनावट तर नाही ना? चितळाचे खरोखर शवविच्छेदन करण्यात आले किंवा नाही, याची चौकशी आता केली जाणार आहे. या प्रकरणात वन अधिकारी व शवविच्छेदनाचे प्रमाणपत्र देणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच या सर्व प्रकरणात चौकीदार मारोती आगाशे, वनपाल, वनरक्षक यांचेही बयाण नोंदविण्यात येणार असल्याने मोठे मासे गळाला लागण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. चौकशीअंती दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे वन्यप्रेमींसह सर्वांचे लक्ष लागून आहे. (नगर प्रतिनिधी)