पावसाच्या तडाख्याने बाजारात फुलकोबीला चार रुपये किलो दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:45+5:30

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसर भाजीपाला उत्पादनासाठी अग्रेसर आहे. शेकडो हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली. फुलकोबी, पानकोबी, भेंडी, मिरची आदींची लागवड करण्यात आली.

Cauliflower rates Rs 4 per kg in the market due to the rains | पावसाच्या तडाख्याने बाजारात फुलकोबीला चार रुपये किलो दर

पावसाच्या तडाख्याने बाजारात फुलकोबीला चार रुपये किलो दर

ठळक मुद्देवाहतुकीचा खर्चही निघणे कठीण । बाजारपेठेत फुलकोबीची मोठी आवक

मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : कांद्याचे दर वाढल्याने कंठशोष करणारे आता भाजीपाल्याचे दर घसरल्यानंतर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतातील कोबीला तर बाजारात केवळ चार रुपये किलो दर मिळत आहे. शेतापासून बाजारपेठेत नेण्याचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसर भाजीपाला उत्पादनासाठी अग्रेसर आहे. शेकडो हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली. फुलकोबी, पानकोबी, भेंडी, मिरची आदींची लागवड करण्यात आली. मात्र गत १० दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला पिकाला बसला. त्यातच ढगाळ वातावरणाने फुलकोबी एकाचवेळी काढायला आली. वरुन पाण्याचा माराही झाला. शेतात फुलकोबी सडण्यापेक्षा शेतकऱ्यांनी ही कोबी बाजारात विक्रीसाठी नेली. मात्र गोबीचा व्यापाºयांनी लावलेला भाव पाहून शेतकºयांना कपाळावर हात मारून घेण्याशिवाय काहीच उरले नाही. बाजारात चार ते पाच रुपये किलोने विक्री होत आहे.
पालांदूर परिसरात शेतकºयांनी बाजारपेठेचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने फुलकोबीची लागवड केली होती. त्यात टप्प्याने फुलकोबी निघणे अपेक्षित होते. परंतु निसर्गाने दगा दिला आणि सर्व कोबी एकाच वेळेस काढायला आली. काढणी, वाहतूक खर्च वगळता शेतकºयांच्या हाती काहीच उरत नाही.एकदम भाव पडल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कांद्याचे भाव आकाशाला भिडले तेव्हा सर्वच जण कंठशोष करीत होते. मात्र आता फुलगोबीसह इतर भाजीपाल्याचे दर खाली आले तरी कुणी शब्द बोलायला तयार नाही. राबराब राबून एखाद्या वेळेस भाजीपाला पिकाला चांगला दर मिळतो तेव्हा सर्व ओरडतात. परंतु बाजारात भाजी विकल्या जात नाही आणि रस्त्यावर जनावरांना टाकावी लागते तेव्हा मात्र कुणी बोलत नाही असे अनेक शेतकरी सांगत होते.

Web Title: Cauliflower rates Rs 4 per kg in the market due to the rains

टॅग्स :agricultureशेती