शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएल कार्डधारक सहा महिन्यांपासून साखरेपासून वंचित

By admin | Updated: July 19, 2014 23:47 IST

मागील सहा महिन्यापासून बीपीएलच्या कार्डधारकांना पवनी तालुक्यात एकाही गावात साखर मिळाली नाही. यासाठी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. दुसऱ्या तालुक्यात दरमहिन्याला साखर मिळते.

कोंढा कोसरा : मागील सहा महिन्यापासून बीपीएलच्या कार्डधारकांना पवनी तालुक्यात एकाही गावात साखर मिळाली नाही. यासाठी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. दुसऱ्या तालुक्यात दरमहिन्याला साखर मिळते. पण येथे मिळत नसल्याने एकाही लोकप्रतिनिधीच्या लक्षात आले नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.साखरेचे भाव गगनाला भिडले आहे. पुढील महिन्यात सणासुदीचे दिवस येत आहेत. अशावेळी राशन दुकानातून साखर मिळाली पाहिजे अशी प्रत्येक बीपीएल कार्डधारकांची अपेक्षा आहे. सहा महिन्यापासून पवनी तालुक्यात साखर न येण्याचे कारण क्षुल्लक आहे. पण त्याकडे तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे जाणीवर्पूक दुर्लक्ष होत आहे. तालुक्यासाठी साखर आणणारी एजन्सी तालुका शेतकी खरेदी विक्री समिती, पवनी ही आहे. या समितीचे कमीशन जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले नाही. म्हणून त्यांनी राशन दुकानदारांचा साखर कोटा उचलणे बंद केले.वाढत्या महागाईमुळे ग्राहकांना रेशन दुकानाचे तांदूळ, गहू, साखरेची उचल करावी लागते. सहा महिन्यापासून साखरेची उचल शेतकी खरेदी विक्री समितीने करणे बंद केले आहे. त्याचा फटका बीपीएलच्या कार्डधारकांना बसत आहे. सध्या रेशन दुकानातून गहू २० किलो व तांदूळ १५ किलो असे ३५ किलो धान्याची उचल कार्डधारक करीत आहेत. पण पुढील महिन्यात राखी, नागपंचमी, जन्माष्टमी, पोळा यासारखे सण समोर आहेत. या सणाच्या काळात प्रत्येक घरी गोड पदार्थ बनविले जात असते. अशावेळी राशन दुकानातून साखर मिळणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन तालुका शेतकी खरेदी विक्री समिती पवनी यांची अडचण काय ते समजून घ्यावे त्याची कमीशन रक्कम नियमित काढल्यास बीपीएल कार्डधारकांना साखर मिळू शकते. यासाठी कोणीतरी समोर येऊन पुढाकार घ्यावे अशी मागणी कार्डधारक करीत आहेत. (वार्ताहर)