शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये 'बायोमेट्रिक' हजेरी

By admin | Updated: June 9, 2015 00:52 IST

राज्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोजण्यासाठी आता संपूर्ण राज्यातील शाळेमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा ...

आधारसोबत जोडणार : पालकांना कळणार माहिती भंडारा : राज्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोजण्यासाठी आता संपूर्ण राज्यातील शाळेमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला. राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे आधार कार्ड निघताच त्यांची लिंक देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ई-लर्निंगद्वारे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या शासन निर्णयाचे शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे.राज्यात २०११ साली पटपडताळणी झाल्यावर अनेक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखविण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शाळांमधील पटसंख्या नोंदणीसाठी 'डाइज'चा उपयोग केला. यात राज्यातील सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांनी आपली विद्यार्थीसंख्या, शिक्षक आणि शाळांची माहिती टाकणे अनिवार्य करण्यात आले. याशिवाय राज्यातील शाळांमध्ये ई-लर्निंगवर भर देण्यात आला. यातूनच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम शाळास्तरावर २७ जूनपर्यंत राबविण्यावर भर देण्यात आला होता. मात्र, यादरम्यान शाळा बंद असल्याने मोहीम बंद करण्यात आली. आता शाळा सुरू होताच ही मोहीम पुन्हा सुरू होणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड येताच शिक्षकांकडून हजेरीचे काम काढण्यात येईल. कार्यालयाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी शाळेत लावलेल्या 'बायोमेट्रिक मशीन'द्वारे करण्यात येईल. तसेच त्याला आधार कार्ड लिंक करण्यात येईल. शाळेत येताच विद्यार्थ्याला आधार कार्ड त्या मशीनला दाखवावे लागेल. याशिवाय याची लिंक पालकांच्या मोबाईलवर देण्यात आल्याने विद्यार्थी शाळेत येताच, पालकांना त्याची माहिती मिळेल. यंदापासूनच हा प्रकल्प सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मत शिक्षण विभागाने व्यक्त केले आहे. (नगर प्रतिनिधी)