भरधाव ट्रक पुलावरुन कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:31+5:30

अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या जवळपास पाच किमीपर्यंत रांग दिसून आली. पोलिसांना वाहतूक पूर्ववत सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सदर पुलावर गतवर्षीही एका दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाला होता. ट्रकच्या धडकेने हा अपघात घडला होता. महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

Bhardhaw truck fell off the bridge | भरधाव ट्रक पुलावरुन कोसळला

भरधाव ट्रक पुलावरुन कोसळला

Next
ठळक मुद्देचालक ठार : राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भरधाव वेगाने असलेला ट्रक पुलावरुन खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. मयुर अशोक भडके (३७) रा. टेकानाका नागपूर असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास राष्टÑीय महामार्गावरील भिलेवाडा पुलावर घडली.
लाखनीहून भंडाराकडे सिमेंट काँक्रीटचे साहित्य घेवून येत असलेल्या ट्रक चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटले. सदर ट्रक पुलाचे कठडे तोडून थेट २७ फूट खोल नाल्यात कोसळला. यात ट्रकचा भार व साहित्यामुळे दर्शनी भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. पुलाचे कठडे तुटल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारधा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहायाने ट्रकच्या दर्शनी भाग वर करुन ट्रक चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. प्रयत्नानंतर कॅबीनमध्ये फसलेल्या ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले. चालकाना बाहेर काढण्यापर्यंत तो जिवंत होता. मात्र रुग्णालयात घेवून जात असताना त्याची प्राणज्योत मालविली.
अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या जवळपास पाच किमीपर्यंत रांग दिसून आली. पोलिसांना वाहतूक पूर्ववत सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सदर पुलावर गतवर्षीही एका दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाला होता. ट्रकच्या धडकेने हा अपघात घडला होता. महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
सन २०१० मध्ये देवरी ते शिंगोरीपर्यंतच्या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले. मात्र शिंगोरी ते बेलापर्यंतचा महामार्गाचे विस्तारीकरण झाले नाही. गत दशक भरात अनेक निरपराध नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे.
बायपास महामार्ग बांधकामाला मंजूरी मिळाली असली तरी बांधकाम व्हायला बराच कालावधी लागणार आहे. महामार्ग अरुंद असल्याने व रहदारीची प्रमाण मोठे असल्याने सातत्याने अपघात घडत असतात. रविवारी रात्रीच्या सुमारास घडलेला अपघातही त्याच स्वरुपात आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

१५ फूट पुलावरुन कार कोसळली नाल्यात
मोहाडी : पुलाचे कठडे तोडून कार पंधरा फुट खोल नाल्यात कोसळल्याची घटना मोहाडी-वरठी मार्गावर सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून चालकाला साधे खरचटलेही नाही. मोहाडीहून वरठीकडे जात असलेली कार क्रमांक एम एच ३७ जी ५७३४ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरुन ही कार पंधरा फुट खोल नाल्यात कोसळली. यात सुदैवाने चालक सचिन वसंता माटे बचावले. घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

Web Title: Bhardhaw truck fell off the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात