शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा तापला ; पारा ४६ अंशावर

By admin | Updated: May 19, 2017 00:49 IST

विदर्भात मागील चार दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांपासून भंडाऱ्याचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले होते.

यावर्षीचा उच्चांक : उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विदर्भात मागील चार दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांपासून भंडाऱ्याचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले होते. गुरूवारी यात वाढ होऊन पारा ४६ अंशावर पोहचला. परिणामी सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे. मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांनाच जाणवू लागला आहे. सोमवारी हवामान खात्यातर्फे घेण्यात आलेल्या नोंदीत पारा ४४.५ अंश सेल्सीअस इतका होता. मंगळवारपासून यात वाढ होत गेली. शुक्रवारी तापमानाने उच्चांक गाठला. मागीलवर्षी सुद्धा मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशांचा आकडा पार केला होता. उष्ण लहरीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी दुपारच्या सुमारास बाहेर निघने टाळत आहेत. थंड पेयांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढत असून सायंकाळी ६ वाजतानंतरच बाजारात गर्दी दिसून येत आहे. आणखी काही दिवस उष्णलहरी कायम राहणार असल्याचीही वेदशाळेने वर्तविली आहे. नवतपा प्रारंभ व्हायला सहा दिवसांचा कालावधी क्षुल्लक असतानाच भंडारा जिल्ह्यात यावर्षी आजच्या तापमानाच्या नोंदीने उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत उष्माघाताचे चार बळी मे महिन्याच्या प्रारंभीच तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले. याचाच परिणाम उष्माघाताच्या रूपाने दिसून आला. उष्माघातामुळे महिन्याभरात जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत पावणारे चारही व्यक्ती या रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुर आहेत. रणरणत्या उन्हात रोजगार हमीच्या कामात जात असल्यामुळेच काही ठिकाणी कामाच्या वेळाही बदलविण्यात आल्या आहेत. मात्र उन्हाचे चटके मानवी आरोग्यावर परिणाम करीत असल्याचे ज्वलंत उदाहरण आहे.