शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख ७० हजार मतदार ठरवणार भंडाराचा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात तीन लाख ७० हजार ६९० मत नोंदणीकृत मतदार आहेत. त्यात एक लाख ८५ हजार २१६ पुरूष तर एक लाख ८५ हजार ४७४ महिला मतदार आहे.

ठळक मुद्देमहिला मतदार अधिक : एक लाख ८५ हजार १२६ पुरूष तर एक लाख ८५ हजार ४७४ महिला मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वांना निवडणूक तारखांच्या घोषणांची प्रतीक्षा आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन मात्र निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. भंडारा या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघातील तीन लाख ७० हजार ६९० मतदार आपला आमदार निवडणार आहे. विशेष म्हणजे पुरूषांपेक्षा महिला मतदाराची संख्या अधिक आहे.भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात तीन लाख ७० हजार ६९० मत नोंदणीकृत मतदार आहेत. त्यात एक लाख ८५ हजार २१६ पुरूष तर एक लाख ८५ हजार ४७४ महिला मतदार आहे. पुरूषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असणारा भंडारा हा मतदारसंघ वैशिष्ट्यपूर्ण आहे.विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जैय्यत तयारी चालविली आहे. मतदार जनजागृतीच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रात पवनी आणि भंडारा या दोन तालुक्यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात शहरी भागात ८५ आणि ग्रामीण भागात २०४ मतदार केंद्र तर पवनी तालुक्यात शहरी भागात २५ आणि ग्रामीण भागात १४२ असे ४५६ मतदार केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. ३०५ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणूक कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते काम पाहत आहेत. सहायक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना सौरंगपते तर भंडाराचे उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ (आयएएस) हे भंडारा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याच नियंत्रणात निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे.सर्वांना निवडणुकीची उत्सुकता लागली असून आचारसंहितेची अर्थात निवडणूक घोषणेची प्रतीक्षा आहे. राजकीय पक्षासह सर्वसामान्यही निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लक्ष देवून आहेत. अवघ्या एक दोन दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात होईल.पोलीस बहुद्देशीय सभागृहात मतमोजणीभंडारा विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी पोलीस मुख्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात होणार आहे. तर मतदानानंतर मतदान यंत्र पोलीस मुख्यालयातीलच वैनगंगा सभागृहात सभागृहात सुरक्षित ठेवले जाणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.

टॅग्स :Votingमतदान