शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

भंडारा अग्निकांड बळींची संख्या पोहोचली 11 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 5:54 AM

नागपुरात ‘रेफर’ केलेल्या एका बालकाचा मृत्यू

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडात अत्यवस्थ असलेल्या एका बालकाचा नागपूर येथे शुक्रवारी मृत्यू झाला. भंडारा तालुक्यातील कोका येथील सोनू मनोज मारबते यांचे ते बाळ होते.मारबते यांच्या बालकाची तब्येत अत्यवस्थ असल्याने त्याला १६ जानेवारी रोजी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने १ फेब्रुवारीला घरी रवानगी करण्यात आली होती. मात्र चार दिवसात प्रकृती पुन्हा खालावली. सतत रडत असल्याने त्याला पुन्हा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केले.१६ जानेवारी रोजी या बालकाला नागपूरला हलविण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी ५ फेब्रुवारीला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. तपासणीनंतर बालकाला मृत घोषित करण्यात आले.- डॉ. पीयूष जक्कल, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडाराबालकाला ‘मिल्क ॲसपिरेशन सिंड्रोम’चा आजारअग्निकांडातून वाचलेल्या बाळांवर उपचार सुरू होते. त्यापैकीच मारबते या दाम्पत्याचा बालकही सहभागी होता. बालकाला श्वास घ्यायला त्रास होता, तर त्याच्या डोळ्यातून सतत पाणी यायचे. शरीरात कार्बनची मात्रा असल्यामुळे श्वसन संस्थेत त्रास होता. त्याला ‘मिल्क ॲसपिरेशन सिंड्रोम’चा आजार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आग