शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाबा कोरोनाने गेले, मेरे पास सिर्फ माँ है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा भंडारा तालुक्यातील एका गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. वृद्ध आई, वडील तसेच ...

कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा

भंडारा तालुक्यातील एका गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. वृद्ध आई, वडील तसेच अन्य एका नातेवाइकाचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याच्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणाबरोबरच इतरही जबाबदारी पार पाडताना आता आईची कसरत होणार आहे. त्यामुळे घरातील कुटुंबकर्ता पुरुषच गेल्याने आता त्या कुटुंबाला शासनासोबतच समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे.

बॉक्स

कोरोनाकाळातही महिला बालविकास विभागाचे कार्य उल्लेखनीय

कोरोणाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक होती. यामध्ये भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एप्रिल महिन्यात घराबाहेर पडतानाही अंगावर काटा उभा राहत होता. मात्र अशाही परिस्थितीत कोरोनाने हिरावलेल्या आई-वडिलांची शोधमोहीम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आली. महिला व बाल विकास कार्यालयाचे कामकाज एप्रिल महिन्यातही सुरूच होते. त्यामुळे कोरोना काळातील महिला व बालविकास विभागातर्फे राबवलेल्या सर्वेक्षण मोहिमेतून जिल्ह्यात आतापर्यंत किती पालकांनी आपल्या आई-वडिलांना गमावले याचा शोध घेण्यात आला आहे. आजही याचे काम सुरूच आहे. त्यामुळे अशा बालकांची शोध मोहीम घेऊन त्यांना शासनाची मदत मिळवून दिली जाणार आहे.

बॉक्स

घरातील कर्ता पुरुषच गेल्याने संकट

कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरवलेली जिल्ह्यात ४५२ बालके आहेत. घरातील कर्ता पुरुषच निघून गेल्याने आता या कुटुंबांना उदरनिर्वाह करताना मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. बाबांचे अकाली निधन झाल्याने आता मुलाचे शिक्षण आणि कुटुंबाचा प्रपंच चालवायचा कसा असा प्रश्न काही महिलांना सतावत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी आता सरकार घेत असून शक्य तितकी मदत देण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

बॉक्स

पाच बालकांचे आईवडिलांचे छत्र हरवले

कोरोनामुळे आईवडील दोघांचाही मृत्यू झाल्याने पाच बालके ही निराधार झाली आहेत. आईवडील दोघांचा किंवा त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास त्या संदर्भात सर्वेक्षण जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच बालकांनी आई आणि वडील दोघांनाही गमावले आहे. तर ५० पालकांनी आपल्या आईला गमावले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४५२ बालकांनी आपल्या वडिलांना गमावले आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला असेल, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास शासनाच्या बालसंगोपन योजनेअंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाह्य केले जाणार आहे.