शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अनलाॅक प्रक्रियेच्या आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

भंडारा : शासनाने घोषित केलेल्या अनलाॅक प्रक्रियेच्या आदेशाची जिल्ह्यातील नागरिकांना प्रतीक्षा असून शनिवारी सायंकाळपर्यंत हा आदेश निर्गमित करण्यात आला ...

भंडारा : शासनाने घोषित केलेल्या अनलाॅक प्रक्रियेच्या आदेशाची जिल्ह्यातील नागरिकांना प्रतीक्षा असून शनिवारी सायंकाळपर्यंत हा आदेश निर्गमित करण्यात आला नव्हता. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. २८८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असुन ३३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

शासनाने घोषित केलेल्या लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्प्याचे निकष घोषित करण्यात आले आहेत. याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्ह्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याचे आदेश निर्गमित करणार आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत भंडारा जिल्ह्यात याबाबतचे आदेश निर्गमित झाले नव्हते. त्यामुळे काय सुरू राहणार व काय बंद राहणार हे कळायला मार्ग नाही. सोमवारपासून अनलाॅक प्रक्रिया सुरु होणार असून सूत्रानुसार भंडारा जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या ४.४१ टक्के आहे. त्यानुसार भंडारा जिल्हा अनलाॅक प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात येत असल्याची माहिती आहे. सर्वांना या आदेशाची प्रतीक्षा आहे.

शनिवारी १००७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ७, लाखनी १०, साकोली ९, तुमसर ५ आणि मोहाडी तालुक्यात २ असे ३३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारी २८८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. आता कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या ५७ हजार २९२ झाली आहे. शनिवारी कोरोनाने कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नसून आतापर्यंत कोरोनाचे १०५५ बळी गेले आहेत.

बाॅक्स

८१७ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून त्यासोबतच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. शनिवारी जिल्ह्यात ८१७ ॲक्टिव्ह रुग्ण होते. त्यात भंडारा १२५, मोहाडी ३९, तुमसर ४१, पवनी २५, लाखनी ५७, साकोली ४९२, लाखांदूर ३८ रुग्णांचा समावेश आहे.