शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

जिल्ह्यातील पहिले आसाम पॅटर्नचे बांबू हट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 5:00 AM

पर्यटकांना विश्रांतीसह सुसज्ज निवाऱ्याची सोय उपलबध व्हावी या हेतूने ४५.२० लाखांच्या चार बांबू हट प्रकल्प बांधकामाला मंजुरी देण्यात आली. परंतु कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवीत वनप्रशासनाने काम बंद पाडले होते. बरेच दिवस काम रखडले होते. अखेर मार्च २०२० मध्ये उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या प्रयत्नाने सदर बांधकाम पूर्ण करण्यात आले असून वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देकोका विश्राम परिसरात प्रकल्प पूर्ण : तर पर्यटक अनुभवणार निसर्गाचा सहवास

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोका येथे तीन वर्षापुर्वी प्रादेशिक वनविभागाच्या वतीने आसाम धर्तीवर पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तसेच पर्यटकांना विश्रांतीसह सुसज्ज निवाऱ्याची सोय उपलबध व्हावी या हेतूने ४५.२० लाखांच्या चार बांबू हट प्रकल्प बांधकामाला मंजुरी देण्यात आली. परंतु कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवीत वनप्रशासनाने काम बंद पाडले होते. बरेच दिवस काम रखडले होते. अखेर मार्च २०२० मध्ये उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या प्रयत्नाने सदर बांधकाम पूर्ण करण्यात आले असून वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.सन २०१७-१८ मध्ये कोका अभयारण्यात पर्यटकांना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, नैसर्गीक वातावरणात राहण्याचा आनंद उपभोगता यावा, परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, स्थानिकांचा सहभाग वाढावा या हेतूने कोका येथे आसाम प्रकल्पावर आधारित बांबू हट निर्मातीचा प्रकल्प प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. कामाचे कंत्राट एका कंपनीला मिळाले होते.परंतु काही कारणांमुळे सदर कामाचा कंत्राट फरीदाबाद येथील कंपनीला देण्यात आला.दुसरीकडे वनप्रशासन व कंत्राटदार यांच्या कचाट्यात बांधकाम सापडले होते. त्यामुळे कामे बंद पडून पावसाचे पाणी बांबू कॉटेजमध्ये शिरून लाकडी फर्नीचरचे नुकसान झाले. लाकडे काळसर पडली. शिवाय अस्वच्छतेमुळे वाळवी लागण्याचा व लाकडे सडण्याचा धोका संभवत होता.अपूर्ण कामांमुळे ज्या हेतूने प्रकल्पावर खर्च करण्यात आला. तो हेतूच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे अखेर उपवनसंरक्षक यांनी पुढाकार घेत नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करून बांधकाम मार्च महिन्यात सुरू केले. तीन महिन्याच्या कालावधीत कामे पूर्ण झाली असून आता प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.आसाम राज्यातील बांबू कामगार कार्यरतआसाम राज्यातील बांबू व कामगार कार्यरत होते.सदर काम चार प्रकारात होणार होते. यातील दोन स्ट्रॅक्वर कोका येथे तर दोन स्ट्रॅक्वर रावणवाडी पर्यटनस्थळी उभारण्यात येणार होते. कोका येथे प्रत्येकी ३.६० लाख अंदाज पत्रकीय लहान स्वरूपात दोन बांबू हट, प्रत्येकी १९ लाख अंदाजपत्रकीय दोन मोठे कॉटेज व कॉरमेंट्री यांचा समावेश आहे. अंदाजपत्रकीय ४५.२० लाखांची कामे वर्षभरात पूर्ण करायची होती. तीन वर्षांनंतरही कामे पूर्ण न झाल्याने तसेच कामाचा दर्जा व गुणवत्ता असमाधानकारक दर्जा समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवीत वनप्रशासनाने काम बंद पाडले.

टॅग्स :Socialसामाजिक