शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविका खऱ्या समाजसेविका

By admin | Updated: March 6, 2016 00:23 IST

स्त्री हीच खरी सेवा देऊ शकते, स्त्रीच्या हातात खूप मोठी शक्ती आहे आणि आशा स्वयंसेविका ही एक स्त्री आहे.

भाग्यश्री गिलोरकर यांचे प्रतिपादन : सर्वोत्कृष्ठ आशा, गटप्रवर्तकांचा मेळावाभंडारा : स्त्री हीच खरी सेवा देऊ शकते, स्त्रीच्या हातात खूप मोठी शक्ती आहे आणि आशा स्वयंसेविका ही एक स्त्री आहे. त्यामुळे तीच समाजाची व देशाची खरी सेवा करू शकते. जेएसवायच्या केसेससाठी बीपीएलची अट रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी दिली. जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा व गटप्रवर्तक पारितोषिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. भंडारा जिल्हा परिषद व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विद्यमाने जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा व गटप्रवर्तक पारितोषिक मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे होते. अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे, जी.आर.सी.एच. अधिकारी डॉ.प्रशांत उईके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.श्रीकांत आंबेकर, डॉ. एस.के. शहारे, डॉ.डी.आर. लक्षशेट्टीवार उपस्थित होते.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील ६०० आशा व गट प्रवर्तक उपस्थित होते. आशा योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार रेखा कुंभलकर, द्वितीय पुरस्कार मिना बोरघरे यांना मिळाला. ७ तालुक्यातून ७ आशांना प्रथम, द्वितीय पुरस्कार तसेच सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रथम येणाऱ्या जिल्ह्यातील ३३ आशांना प्रथम पुरस्कार म्हणून प्रत्येकी रोख रक्कम देण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्व आशांना आरटीजीएस द्वारे पुरस्कार राशी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशांनी उत्कृष्ट काम केले आहे त्यांना नावीन्यपूर्ण कार्यांतर्गत प्रथम पुरस्कार रेखा बरडे, संगीता बांगरे तर द्वितीय पुरस्कार वनिता पंचबुद्धे, नंदा चवडे, प्रा.आ. केंद्र केसलवाडा यांना आरटीजीएसद्वारे पुरस्कार राशी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक प्रथम पुरस्कार कांचन मेश्राम, द्वितीय पुरस्कार मनीषा डोंगरवार तर तृतीय पुरस्कार इंदिरा सिरारी यांना आरटीजीएसद्वारे पुरस्कार राशी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र बेटाळा व देव्हाडी येथील आशांचा जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक आल्यामुळे त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील गटप्रवर्तक व तालुक्यातील तालुका समुह संघटक यांना गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे म्हणाले, पुढील अर्थसंकल्पीय वर्षात जिल्हा निधीतून आशांकरिता नावीन्यपूर्ण योजना व साहित्य देण्याबाबत आश्वासन दिले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी केले. संचालन डॉ.शांतीवन लुंगे, चंद्रकुमार बारई यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.श्रीकांत आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाकरिता एन.आर. पाखमोडे, पी.एम. डब्ल्यू. पंचायत समिती लाखनी, डॉ.बी.एस. मस्के जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, डॉ. भास्कर खेडीकर जिल्हा आयुष अधिकारी, मनीष सेलोकर, गणेश टेंभुर्णे, किशोर अम्रृतकर, प्रदीप दहिवले, सचिन मते, दमयंती कातुरे, संगीता गोंडाणे यांच्यासह सर्व तालुका समुह संघटक व गटप्रवर्तक यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)