शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
4
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
5
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
6
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
7
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
8
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
9
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
10
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
11
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
12
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
13
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
14
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
15
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
16
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
17
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
18
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
19
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
20
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीतील देवदूतांनी वाचविले पुरात अडकलेल्या शेकडोंचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST

जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला.

ठळक मुद्देजीव धोक्यात घालून शिरले पुराच्या पाण्यातसुखरुप बाहेर निघालेल्यांचा पोलिसांना सॅल्यूट

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : किर्र अंधाऱ्या रात्री वैनगंगा कोपली. पुराचे पाणी छतापर्यंत टेकले. शेकडो कुटुंब पुरात अडकले. मदतीसाठी धावा करुनही कुणापर्यंत आवाजच जात नव्हता. अशा कठीणप्रसंगी धावून आले ते खाकी वर्दीतील वीर जवान. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला.

समाजाचा सजग प्रहरी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ असे पोलिसांबाबत म्हटले जाते. मात्र अनेकदा पोलीसही टीकेचेच धनी होतात. एखाद्या घटनेत पोलिसांवरच ताशेरे ओढले जातात. मात्र भंडारा जिल्ह्यात आलेल्या पुरात जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी बजावलेली कामगिरी अतुलनीय आहे. रविवारची सकाळ उजाळली ती महापुराची वार्ता घेवून. सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक कुटुंब पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु होते. यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी अगदी आघाडीवर होते. अहोरात्र पुरग्रस्तांना मदत करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी तर पुरामुळे पोहचणे कठीण होते. अशाठिकाणी ट्यूबच्या सहाय्याने पोहोचून सुरक्षित स्थळी हलविले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. भंडारा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध वसाहतीत शनिवारी रात्रीच धाव घेतली. ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, गणेशपूर, नागपूर नाका, प्रगती कॉलनी आदी भागातील नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यास मदत केली. घरातील वृद्ध व्यक्तींना आणि लहान मुलांना अक्षरश: कंबरभर पाण्यातून उचलून आणले. तुमसर, मोहाडी, पवनी पोलीसही यात आघाडीवर होते.

लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तर पुरात आपला जीव धोक्यात घालून अनेकांना बाहेर काढले. सुरक्षेच्या साधनांचा अभाव असतानाही या जवानांनी पुरात शिरुन अनेकांना बाहेर काढले. पोलिसांनी केलेल्या या कार्याची कुणी दखल घेतली नसली तरी पुरातून बाहेर पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरील समाधान हे पोलिसांसाठी सर्वात मोठे अवार्ड होते.

पोलिसांची धडपडलाखांदूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा विळखा पडला होता. प्रशासनाची मदत पोहोचण्यास विलंब लागत होता. अशा परिस्थितीत लाखांदूर पोलिसांचे पथक गावागावांत जावून पुरग्रस्तांना बाहेर काढत होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञांसोबत पोलिसांनीही तीन दिवस मदत कार्यात स्वत:ला झोकुन दिले होते. पुरग्रस्तांसाठी पोलीस देवदूतच ठरले. वेळीच पोलीस मदतीला धावून आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.

टॅग्स :floodपूर