शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बॉटलमधून दारुचे पार्सल

By admin | Updated: September 1, 2016 00:43 IST

दारु पिणाऱ्याला व विकणाऱ्याला शंभर मार्ग आहेत, असे नेहमी बोलल्या जाते. ती सत्यता भंडारा तालुक्यातील संगम या गावात पाहायला मिळत आहे.

संगम गावातील प्रकार : छुप्या मार्गाने दारुचा गोरखधंदाभंडारा : दारु पिणाऱ्याला व विकणाऱ्याला शंभर मार्ग आहेत, असे नेहमी बोलल्या जाते. ती सत्यता भंडारा तालुक्यातील संगम या गावात पाहायला मिळत आहे. छुप्या मार्गाने दारुची अवैध विक्री पाण्याच्या बॉटलमधून होत आहे. पोळा सण असल्याने दारु विक्रीला उधाण येणार असल्याच्या चर्चेने जोर चढला आहे.भंडारा मुख्यालयापासून ५ कि.मी. अंतरावर संगम (पुनर्वसन) हे प्रकल्पबाधीत गाव आहे. या गावात हातभट्टीवरील मोहफुलाची दारु मिळते. तशी गावोगावी दारु विक्रीची दुकाने आहेत. मात्र संगम येथे परिसरातील दारुड्यांची येथे जत्रा भरत असते. विशेष म्हणजे गुरुवार व शुक्रवार पोळ्याचा सण असल्याने दारुड्यांची चौकाचौकात नेहमीप्रमाणे गर्दी राहणार आहे. यात लाखो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे बेला, मुजबी, दवडीपार, शहापूर, फुलमोगरा, पिपरी, कवडसी, भोजापूर, जाख, उमरी आदी परिसरातील दारुडे येथे येत असतात. त्यामुळे गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.दुसरीकडे गावात दारुचे वाढते प्रमाण व दारु पिणाऱ्यांचा येणारा लोंढा पाहून गावातील दारु विक्रेते सज्ज झाले आहेत. दारुची कमतरता भासू नये याची पुरेपुर खबरदारी मागील आठ दिवसांपासून दारु विक्रेत्यांनी घेतली आहे. मोठ्या प्रमाणात दारुचा साठा जमविल्याची चर्चा आहे. दारुची बॉटल सहज ओळखता येत असल्याने पाण्याच्या एक लिटर बॉटलमधून दारुची विक्री करण्याची शक्कलही येथे लढविण्यात आली आहे. जवळपास ५०० लोकसंख्या असलेल्या या गावात दारुच्या अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासन यावर लक्ष केंद्रीत करणार काय? हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)