शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

५ कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

तुमसर : तुमसर तालुक्यात तलावांची संख्या मोठी असून, शेती सिंचनाकरिता आंतरराज्य बावनथडी प्रकल्पही अस्तित्वात आहे; परंतु प्रकल्प स्थळापासून काही ...

तुमसर : तुमसर तालुक्यात तलावांची संख्या मोठी असून, शेती सिंचनाकरिता आंतरराज्य बावनथडी प्रकल्पही अस्तित्वात आहे; परंतु प्रकल्प स्थळापासून काही अंतरावर असलेली आठ गावे सिंचनापासून अद्यापही वंचितच आहेत. या गावांना सिंचनाचा लाभ व्हावा, याकरिता ३५ कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे; परंतु अद्यापही या सिंचन प्रकल्पाच्या कामाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हा प्रकल्प अद्यापही धूळखात पडून आहे.

तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील आठ गावे सिंचनापासून वंचित आहेत. यात गोबरवाही, सीता सावंगी, सुंदर टोला, येदरबुची, पवनार खारी, गणेशपूर, हेटी टोला येथील शेतकऱ्यांना बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होत नाही. पवनार खारी येथे पाटबंधारे विभागाचा मोठा तलाव आहे. तसेच येदरबुची येथे जिल्हा परिषदेचा तलाव आहे. या दोन्ही तलावांत पावसाळ्यात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे बराच तलाव कोरडाच राहतो.

भाजप-सेनेच्या कार्यकाळात राज्य शासनाने दोन्ही तलावांना बावनथडी प्रकल्पाच्या राजापूर वितरिकेला तलाव भरण्याचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विभागाकडे पाठविला होता. त्यामुळे उपसा सिंचन प्रकल्प येथे अस्तित्वात आल्यास पिण्याचे पाणी व सिंचनाची समस्या सुटली असती; परंतु या प्रस्तावाला अजूनपर्यंत राज्य शासनाने मंजुरी दिलेली नाही. गोबरवाही परिसरातील आठ गावांकरिता ३५ कोटींच्या उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्याकरता विदर्भ पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु अद्याप या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. हा प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून असल्याची माहिती आहे. सदर प्रकल्प पूर्ण व्हावा याकरिता बावनथडी प्रकल्प संघर्ष समिती गठित करण्यात आली होती. या समितीतर्फे अनेकदा निवेदने दिली व धरणे आंदोलन करण्यात आले; परंतु अद्यापही या प्रकल्पाला शासन आणि प्रशासनाचे मान्यता मिळाली नाही.

बाॅक्स

शेतकऱ्यांत प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर या परिसरातील शेतकऱ्यांनी बहिष्कार घातला होता. बावनथडी प्रकल्पापासून सदर आठही गावे ही २० ते २२ किलोमीटर अंतरावर असून या गावांना अद्यापही सिंचनाचा लाभ मिळाला नाही. ही गावे उंचावर असल्याचे कारण संबंधित विभागाचे वरिष्ठ अभियंते देत आहेत. त्यामुळे या गावाना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होत नाही. त्याकरिता उपसा सिंचन प्रकल्प उभारण्याची गरज आहे. पवनार खारी येथे मोठे तलाव उपलब्ध आहेत. या तलावांची पाणी साठवणूक क्षमता मोठी आहे. त्यामुळे कायमस्वरूपी येथे उपसा सिंचन प्रकल्प अस्तित्वात आल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते; परंतु राजकीय इच्छाशक्ती येथे कमी दिसत आहे.

बावनथडी प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला; परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या या आठ गावांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष आहे.