शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील ४८८ तरूण वैद्यकीय चाचणीसाठी पात्र

By admin | Updated: January 10, 2016 00:40 IST

भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे ती पहिल्यांदा खुली सैनिक भरती होत आहे. विदर्भातील १० जिल्ह्यांसाठी असलेल्या सैन्य भरती ...

भंडारा : भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे ती पहिल्यांदा खुली सैनिक भरती होत आहे. विदर्भातील १० जिल्ह्यांसाठी असलेल्या सैन्य भरती कार्यक्रमानुसार शुक्रवारला भंडारा जिल्ह्यातील तरूणांची भरती घेण्यात आली. यासाठी ५,१४१ उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ३,९५३ तरूण रॅलीत सहभागी झाले. यामधून ४८८ उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंतच्या चाचणीत पात्र ठरलेली ही संख्या सर्वाधिक आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी धावण्याच्या चाचणीसाठी तयार असलेल्या चमुला झेंडी दाखविली. जिल्ह्यातील तरुणांना या रॅलीचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, सैनिक कल्याण अधिकारी यांच्या वतीने सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्याचा निश्चितच फायदा झाल्याचे दिसत होते. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदा सैन्य भरती घेण्यात येत असल्यामुळे त्याचा लाभ भंडारा जिल्ह्यातील तरूणांना होत आहे. भविष्यात सैन्यात भंडारा जिल्ह्यातील तरूणांना संधी मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या गौरवात भर पडणार आहे. कारण हे सैनिक बनून देशाची सेवा करणार आहेत.सहभागी झालेल्या ३,९५३ उमेदवारांपैकी कागदपत्रांची पुर्तता करणारे २,९४५ उमेदवार धावण्याच्या चाचणीमध्ये पात्र ठरले. या चाचणीमधून उद्या होणाऱ्या वैद्यकीय चाचणीसाठी ४८८ उमेदवार पात्र ठरले आहेत. उद्या रविवारला नागपूर जिल्ह्यासाठी सैन्य भरती होणार आहे. या रॅलीत सहभागी झालेल्या उमेदवारांची एवढया मोठया प्रमाणात पात्र होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे कर्नल महेंद्रकुमार जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)