शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराची ४५८ कामे अर्धवट

By admin | Updated: May 8, 2017 00:20 IST

राज्य शासनासाठी महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलशिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १०१० कामांपैकी ४५८ कामे अजुनही पूर्ण व्हायची आहे.

५५२ कामे पूर्ण : आतापर्यंत ५.५१ कोटींचा खर्चइंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनासाठी महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलशिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १०१० कामांपैकी ४५८ कामे अजुनही पूर्ण व्हायची आहे. विशेष म्हणये बूर्ण झालेल्या ५५२ कामांसाठी प कोटी ५१ लक्ष २६ हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे. सदर अर्धवट कामे सुरू असून मान्सुनच्या आगमनापूर्वी पुर्ण करण्याचा कृषी विभागाचा मानस आहे.पावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा मुख्य उद्देश्य नजरेसमोर ठेवून सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावातील शंभर टक्के कामे पूर्ण करुन येत्या पावसाळयात प्रत्येक गावात जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिवार,मागेल त्याला शेततळे, खोल-सलग-समतल चर, साखळी सिमेंट बंधारा, नाला खोलीकरण, सिंचन विहिर बांधकाम, मजगीचे बांधकाम, पाणी साठवण बंधारा, मजगीचे पुनर्रजीवन, लघु पाटबंधारे विभागांतर्गत मामा तलाव दुरुस्ती या योजनेंतर्गत कामे सुरू आहेत. सन २०१६-१७ अंतर्गत एकूण ५९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची २२६ कामे प्रगतिपथावर आहेत.या विभागांचाही सहभागजलयुक्त शिवार अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये कृषी विभागासह अन्य विभागांचाही सहभाग घेण्यात येत आहे. यात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे विभाग, लघुसिंचन (जलसंधारण) गोंदिया, उपवनसंरक्षक वनविभाग भंडारा, सामाजिक वनीकरण भंडारा, जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पेंच व्यवस्थापन, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांचा सहभाग आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागीलवर्षी म्हणजे सन २०१५-१६ मध्ये एक हजार २४ कामे पूर्ण करण्यात आली आहे. या कामासाठी एकूण २८ कोटी ७१ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून तालुकानिहाय ८६ गावांची निवड करण्यात आली होती. सर्व यंत्रणा मिळून ही कामे यशस्वीपणे पुर्ण करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील गराडा (बु.), गराडा (खु.), सिल्ली, मानेगाव, मकरधोकडा, नवरगाव, ईटगाव, गोलेवाडी, माटोरा, खमारी, पलाडी, मंडनगाव, कवलेवाडा, माडगी, खुर्शीपार या गावाचा समावेश करण्यात आला होता. तसेच तुमसर तालुक्यातील १९, मोहाडी तालुक्यातील १५, पवनी तालुक्यातील १२, साकोली तालुक्यातील ११, लाखनी तालुक्यातील नऊ तर लाखांदूर तालुक्यातील सहा गावांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात आली होती.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या अभियानांतर्गत फायदा मिळवून देण्यासाठी त्या दिशेने जिल्हा कृषी कार्यालयाचे कामे सुरू आहे. सिंचन सुविधा विकसित करण्यावर आमचा भर आहे. जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान असृन जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. यासाठी निधीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. -डॉ. नलिनी भोयर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,भंडारा