शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पूरबाधित जागा ३० वर्षांच्या लीजवर

By admin | Updated: February 25, 2016 00:33 IST

शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील ५२ हजार ७३९ चौरस फूट जागा पूरबाधित असल्यामुळे महिला रुग्णालयाला नाकारण्यात आली.

गैरव्यवहाराचा आरोप : महिला रुग्णालयाला जागा नाकारलीभंडारा : शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील ५२ हजार ७३९ चौरस फूट जागा पूरबाधित असल्यामुळे महिला रुग्णालयाला नाकारण्यात आली. मात्र, आता हीच जागा खासगी व्यक्तीला १ लाख रुपयात ३० वर्षांच्या लीजवर देण्यात आली. यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भ्रष्टाचाराविरोधी सामाजिक न्याय मंचने मुख्यमंत्र्यांकडे केली. यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा १४ मार्चपासून उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.शहरातीलन नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगत शीट क्रमांक ५७ - ३/२ व ५७ - ३/१ आखिव पत्रिकेनुसार ५२ हजार ७३९ चौरस फूट जागा शासकीय मालकीची आहे. वैनगंगेला पूर येतो. तेव्हा जलशुद्धीकरण केंद्रात अंदाजे २० फूट पुराचे पाणी असते. सदर जागा जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या महिला आरोग्य केंद्रासाठी मिळण्यासाठी आरोग्य विभागाने मागणी केली होती. त्यासंदर्भात २२ आॅगस्ट २०१४ ला उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी गोसीखुर्द विभागाच्या पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे सदर जागेची प्रत्यक्ष चौकशी करण्यास सांगितले. त्यावर पुनर्वसन अधिकाऱ्यांनी ही जागा रेड झोनमध्ये येत असल्यामुळे पूरबाधित जागा देता येत नसल्याचे कळविले होते. मात्र आता नगरपालिकेने हीच जागा खासगी व्यक्तीला १ लाख रुपयात ३० वर्षासाठी लीजवर दिली.प्रस्तावित महिला व बालरुग्णालयासाठी संबंधित विभागाने नाकारलेली ५२ हजार ७३९ चौरस फूट जागा खासगी व्यक्तीला ३० वर्षांसाठी लीजवर देण्यात आली. त्यानंतर तत्काळ बांधकामाला सुरुवातही झाली आहे. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचने केला आहे. तेव्हा पूरबाधित जागेवर लीज तत्काळ रद्द करण्यात यावी, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, १९६५ पासून ही जागा पूरबाधित आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात यावी, बाजारासाठी शेतकरी संस्थेऐवजी खासगी व्यक्तीला कमी दरात का दिली याची चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्यामार्फत पाठविण्यात आले. यातील दोषींविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी १४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा विष्णूदास लोणारे, नितेश मोगरे, लक्ष्मीकांत दांडेकर, राजकुमार दहेकर यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)