शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या २३८ कामांवर १.१६ कोटींचा खर्च

By admin | Updated: June 17, 2017 00:23 IST

सन २०१६-१७ यावर्षात मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३५१ कामे विविध विभागांमार्फत प्रस्तावित करण्यात आली होती.

७५ कामे अपूर्ण : ९८ हेक्टरला होणार सिंचनाचा लाभयुवराज गोमासे । लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २०१६-१७ यावर्षात मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३५१ कामे विविध विभागांमार्फत प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी एकूण ३८ कामे वर्षभरात सुरू केली नाही. तर ४० कामे रद्द करण्यात आली. ३१३ कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी २३८ कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आली. तर उर्वरित ७५ कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर १ कोटी १६ लक्ष ५ हजार १७५ रूपयांचा खर्च झाला असून ९८.७ हेक्टर क्षेत्राला ओलीताची सोय सन २०१७-१८ मध्ये होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.जलयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये एकूण १० गावे समाविष्ट होती. गावांमध्ये मुलभूत ओलीतांच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी कृषी विभाग मोहाडी, पंचायत समिती, जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा, वनविभाग, पेंच व्यवस्थापन, भुजन सर्व्हेक्षण आदी विभागाने कामे केली गेली. कृषी विभागाअंतर्गत चार शेततळे पूर्ण झाली. १० दिवसापैकी ६ कामे पुर्ण झाली. चार प्रगतीपथावर आहेत. सहा सिमेंट बंधारा दुरूस्तीपैकी दोन कामे पूर्ण तर चार कामे पूर्ण होण्याच्या टप्यात आहेत. मोहाडी पं.स. अंतर्गत मजगीची चार कामे करण्यात आली. मजगी पुनर्जिवनाची १३५ कामापैकी १०३ कामे पूर्ण झाली तर ३२ कामे प्रगतीपथावर आहेत. एकूण १३९ कामापैकी १०७ कामे पूर्ण तर ३२ कामे अपूर्ण आहेत. यावर ४०,५५,०९५ लक्ष रूपयांचा खर्च होवून ३१.४५ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा अंतर्गत सिनाबाची सात कामे पूर्ण झाली. साठवण बंधाऱ्यांच्या पाच कामापैकी एक काम पूर्ण होवून चार कामे अपूर्ण आहेत. साठवण बंधारा दुरूस्ती व खोलीकरणाची सहा पैकी चार कामे पूर्ण तर दोन कामे प्रगतीपथावर आहेत. केटीवेअर दुरूस्तीचे पाच पैकी एक काम पूर्ण तर चार कामे अपूर्ण आहेत. मामा तलाव दुरूस्तीची सात कामे अपूर्ण आहेत. एकूण ३० कामापैकी सहा कामे पूर्ण तर २४ कामे अपूर्ण आहेत यावर आतापर्यंत फक्त दोन लाख सहा हजाराचा खर्च झालेला आहे.सामाजिक वनीकरण,लघु पाटबंधारे नापाससन २०१६-१७ वर्षात सामाजिक वनकरण विभागाचे वतीने नियोजनाच्या आखाड्यात वृक्ष लागवडीचे फक्त एक काम प्रस्तावित करण्यात आले होते. तर पाटबंधारे श्रेणी एकच्या वतीने कालवा दुरूस्तीचे दोन व लपा तलाव दुरूस्तीचे एक असे तीन कामे प्रस्तावित केली होती. परंतु दोन्ही विभागाला वर्षभरात एकही काम सुरू करता आले नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेसाठी दोन्ही विभाग नापास ठरल्याचे दिसून येते.