शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अष्टसात्त्विक भाव कशाला म्हणतात? ते कसे जागृत होतात व त्यामुळे काय बदल घडतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 07:05 IST

अध्यात्म मार्गावर चालणारी व्यक्ति ईश्वराशी रममाण होते त्यावेळी हे भाव जागृत होतात असे म्हटले जाते, पण ते कसे ओळखावे हे जाणून घ्या.

अध्यात्म मार्गावर चालणार्‍या व्यक्तीचे भाव सात्विक होत जातात. व्यक्ति अंतर्बाह्य बदलते. तिचे आध्यात्मिक तेज दिसू लागते, जाणवू लागते. अशा परमार्थिक मार्गावर पुढे जात असताना एक क्षण असा येतो जेव्हा भक्त भगवंत एकरूप होतात. त्यावेळेस भक्ताचे अष्टसात्त्विक भाव जागृत असे म्हणतात. पण ते ओळखायचे कसे, याबाबतीत सोशल माध्यमावर व्हायरल झालेला हा महितीपूर्ण लेख. 

साधारणपणे मुमुक्षु साधनेत किंवा भक्ती करताना त्याच्या अंगावर अष्टसात्विक भाव प्रगट होत असतात. काय असतात ते भाव? भक्त किती वर्ष भक्तिमार्गामध्ये किंवा साधनेत आहे, हे त्याच्या ज्येष्ठतेवरून त्याची भक्तिमार्गातील-प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत आहे यावरून त्याच्यी आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते.....

प्रथम भाव -  स्वेद 

मंत्र, स्तोत्र, जप करताना, ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याची सेवा पूर्वजन्मातील प्रारब्द शुद्ध करण्यात खर्च होते.

दुसरा भाव - कंप 

या भावात पोहोचल्यावर भक्ताच्या शरीराला कंप सुटतो. शरीरात कंप जाणवते.

तिसरा भाव -  रोमांच 

स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोथी वाचताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेचा तिसरा भाव समजावा.

चतुर्थ भाव -  अश्रू 

सदगुरुंच्या किंवा इष्टदेवतेच्या आठवणीने हृदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. 
हा भाव सेवेक-याच्या हृदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकर्‍यांकडून सदगुरुविषयक किंवा देवतेची स्तुतिपर काव्यनिर्मिती होते. 

खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवाकाल वाढवायला हवा. निदान एकाच आसनावर बसून एका तासावर जप करायला हवा. अशी दीड वर्षे साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.

पंचम भाव – सत्त्वापत्ती 

या भावात प्रवेश केल्यावर अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. सदगुरुमय होऊन जातो. 
पण सर्वसामान्य माणसे चवथ्या भावापर्यंत या जन्मात पोहोचतात व पुढच्या जन्मात पुढचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो.

षष्टभाव - समाप्ती 

या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख-दु:ख मान-अपमान, निंदा-स्तुती सर्वसमान वाटू लागतात. अभिमान, अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सत्गुण वाढू लागतात.

सप्तम भाव -  असंसक्ती 

सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांचे दर्शन-साक्षात्कार-संभाषण होतात. षट्चक्रे जागरूक होतात-इतरांचे भूत-भविष्य समजते, बोललेले शब्द सत्य होतात. 
या भावात गुरू दुर्लक्ष करतात. साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते व जन कल्याणाचे कार्य करावे.

अष्टमभाव - प्रलय 

या भावात साधक ईश्वराशी एकरूप होतो. सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात .
🙏🙏