वास्तुशास्त्रानुसार, वास्तूमध्ये ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी विविध प्रतीकांचा वापर केला जातो. यामध्ये तांब्यापासून बनवलेले सूर्याचे प्रतीक हे अत्यंत प्रभावी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते. १ फेब्रुवारीला माघी पौर्णिमा(Maghi Purnima 2026) आहे आणि त्याच दिवशी रविपुष्य योग(Ravi Pushya Yoga 2026) जुळून येत आहे. या शुभ मुहूर्तावर या प्रतीकाची स्थापना करणे तुमच्या प्रगतीचे द्वार उघडू शकते.
Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय!
तांब्याचा सूर्यच का?
सूर्य हा ऊर्जेचा, आरोग्याचा आणि आत्मविश्वासाचा कारक आहे. ज्या घरांमध्ये जागेअभावी थेट सूर्यप्रकाश पोहोचत नाही, तिथे सूर्याच्या ऊर्जेचा अभाव जाणवतो. अशा वास्तूंमध्ये तांब्याचा सूर्य लावल्याने सूर्याची सात्विक ऊर्जा प्रवाहित होते आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते.
तांब्याच्या सूर्याचे अद्भुत लाभ:
१. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा: तांब्याचा सूर्य घरात किंवा ऑफिसमध्ये लावल्याने समाजात मान-सन्मान वाढतो. सरकारी कामात किंवा उच्च पदावर असलेल्या लोकांसाठी हे प्रतीक अत्यंत लाभदायक ठरते.
२. आकर्षण शक्ती: तांब्यामध्ये नैसर्गिक आकर्षण शक्ती असते. हे प्रतीक घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि पैसा, संपत्ती तसेच प्रगतीच्या नवनवीन संधींना आकर्षित करते.
३. कौटुंबिक सलोखा: ज्या घरांमध्ये सतत मतभेद किंवा कलह असतात, तिथे सूर्याचे हे प्रतीक लावल्याने घरातील वातावरण सौहार्दपूर्ण होते आणि सदस्यांमधील प्रेम वाढते.
४. सृजनशीलतेला बळ: व्यापार आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी तांब्याचा सूर्य त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनत्त्वाला बळ देण्याचे कार्य करतो.
कोणत्या दिशेला आणि कुठे लावावे?
पूर्व दिशा: वास्तूच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर तांब्याचा सूर्य लावणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. यामुळे वास्तूतील मोठे दोष दूर होतात आणि समृद्धी येते.
मुख्य दरवाजा: जर घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल, तर दरवाजाच्या बाहेरील बाजूस हे चिन्ह लावावे. यामुळे घरात येता-जाता सूर्यदर्शन होईल आणि धन-संपत्तीचा ओघ वाढेल.
ऑफिस: करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि नोकरी-व्यवसायात यश मिळवण्यासाठी ऑफिसच्या पूर्वेकडील भिंतीवर तांब्याचा सूर्य लावावा.
Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत
१ फेब्रुवारीचा शुभ मुहूर्त
या दिवशी 'रविपुष्य' आणि 'सर्वार्थ सिद्धी' असा दुर्मिळ योग असल्याने, या दिवशी सूर्यचिन्हाची स्थापना केल्यास त्याचे फळ शतपटीने मिळते. ज्यांना प्रत्यक्ष सूर्य दर्शन घेणे शक्य नाही, त्यांनी या प्रतीकाद्वारे सूर्याच्या ऊर्जेचा लाभ घ्यावा, असे वास्तुशास्त्र सांगते.
Web Summary : Install a copper sun symbol on February 1st (Maghi Purnima, Ravi Pushya Yoga) to attract positive energy, wealth, respect, and harmony. Place it in the east or near the main door for best results.
Web Summary : 1 फरवरी (माघी पूर्णिमा, रवि पुष्य योग) को तांबे का सूर्य स्थापित करें। यह सकारात्मक ऊर्जा, धन, सम्मान और सद्भाव को आकर्षित करता है। सर्वोत्तम परिणामों के लिए इसे पूर्व में या मुख्य दरवाजे के पास रखें।