माघी पौर्णिमा २०२६: १६२ वर्षांनंतर माघी पौर्णिमेला महायोग! 'हे' ३ उपाय पालटतील तुमचे नशीब; चुकवू नका ही सुवर्णसंधी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:36 IST2026-01-30T14:34:37+5:302026-01-30T14:36:55+5:30

Magh Purnima 2026: रविवार १ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेला एक दुर्मिळ योग जुळून येत आहे, त्या दिवशी आपल्या भाग्याला कलाटणी देणारे ३ उपाय आवर्जून करा. 

Magh Purnima 2026: Mahayoga on Maghi Pournima after 62 years! 'These' 3 remedies will change your luck; Don't miss this golden opportunity | माघी पौर्णिमा २०२६: १६२ वर्षांनंतर माघी पौर्णिमेला महायोग! 'हे' ३ उपाय पालटतील तुमचे नशीब; चुकवू नका ही सुवर्णसंधी  

माघी पौर्णिमा २०२६: १६२ वर्षांनंतर माघी पौर्णिमेला महायोग! 'हे' ३ उपाय पालटतील तुमचे नशीब; चुकवू नका ही सुवर्णसंधी  

१ फेब्रुवारी २०२६ रोजी येणारी माघी पौर्णिमा(Magh Purnima 2026) ही अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी ठरणार आहे. तब्बल १६२ वर्षांनंतर या दिवशी 'रविपुष्य' आणि 'सर्वार्थ सिद्धी' योगाचा सुवर्णसंगम होत आहे. या विशेष पर्वाचे महत्त्व आणि त्या दिवशी करायचे ३ प्रभावी उपाय वाचा आणि आठवणीने करा. 

Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत

ज्योतिषशास्त्रानुसार, रविवारी येणारा पुष्य नक्षत्र योग म्हणजेच 'रविपुष्य योग' हा सर्व कार्यांत यश देणारा मानला जातो. यंदा १ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:५२ मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होत असून, या दिवशी रविपुष्यासह सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने याचे आध्यात्मिक महत्त्व कित्येक पटीने वाढले आहे.

या महायोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी खालील ३ उपाय आवर्जून करावेत:

१. स्नान आणि नामस्मरण: नकारात्मकता होईल दूर

पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकावे. स्नान करत असताना 'ओम विष्णवे नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. काळे तीळ नकारात्मकता शोषून घेतात, तर गंगाजल आणि विष्णू मंत्राच्या प्रभावाने तुमच्याभोवती एक सकारात्मक ऊर्जावलय (Positive Aura) तयार होते.

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींशी लग्न होणे हे 'लॉटरी' लागण्यासारखेच!

२. गूळ दान: सूर्य तेजाची प्राप्ती

रविपुष्य योगाचा स्वामी सूर्य आहे. तुमच्या कुंडलीतील रवी (सूर्य) ग्रह बलवान करण्यासाठी आणि समाजात मानसन्मान मिळवण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन गरजू व्यक्तीला गूळ दान करावा. या उपायामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होते आणि आत्मबळ वाढते.

३. चंद्राची शीतल छाया: आरोग्याचा अमृतयोग

पौर्णिमेच्या रात्री तांदळाची खीर तयार करावी आणि ती काही वेळ चंद्रप्रकाशात ठेवावी. असे मानले जाते की, माघी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृत वर्षाव होतो. ही खीर ग्रहण केल्याने आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्ती होते.

Astro Tips: केवळ कष्ट पुरेसे नाहीत! भाग्याची साथ मिळवण्यासाठी करा 'हे' ३ साधे उपाय

Web Title : माघी पूर्णिमा 2026: 62 साल बाद महायोग, बदलेगा भाग्य!

Web Summary : माघी पूर्णिमा 2026 में रवि पुष्य और सर्वार्थ सिद्धि योग का दुर्लभ संयोग है। गंगाजल से स्नान, गुड़ का दान और चंद्रप्रकाशित खीर का सेवन करने जैसे अनुष्ठान सकारात्मकता, सफलता और अच्छा स्वास्थ्य ला सकते हैं। इस अवसर को न चूकें!

Web Title : Maghi Purnima 2026: Auspicious Yoga After 62 Years; Change Your Luck!

Web Summary : Maghi Purnima 2026 brings a rare Ravi Pushya and Sarvartha Siddhi Yoga. Performing suggested rituals like bathing with holy water, donating jaggery, and consuming moonlit rice pudding can bring positivity, success, and good health. Don't miss this opportunity!