Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:08 IST2026-01-30T14:07:38+5:302026-01-30T14:08:41+5:30
Hanuman Chalisa: ११ दिवसांचे हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केले तर त्याचा लाभ होतो असा भाविकांचा अनुभव आहे, हा उपाय कसा करावा ते जाणून घ्या.

Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत
जीवनात जेव्हा एखादे काम खूप प्रयत्नानंतरही अडकून पडते किंवा संकटांचा डोंगर समोर उभा राहतो, तेव्हा 'संकटमोचन' हनुमानाची भक्ती हाच सर्वोत्तम मार्ग ठरतो. भक्तांचा असा अनुभव आहे की, ११ दिवसांच्या या विशिष्ट पद्धतीने केलेल्या हनुमान चालीसा पठणामुळे खुद्द बजरंगबली आपल्या पाठीशी उभे राहतात.
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींशी लग्न होणे हे 'लॉटरी' लागण्यासारखेच!
संकल्पाची आणि पूजेची पद्धत:
या व्रतासाठी काही विशेष नियम आणि शिस्त पाळणे आवश्यक आहे.
१. सुरुवात: हे व्रत कोणत्याही मंगळवारपासून सुरू करावे.
२. वेळ: पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून, स्नान आटोपून स्वच्छ कपडे परिधान करून पूजेला बसावे.
३. पूजा मांडणी: पूजेच्या ठिकाणी राम पंचायतनाचा (राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान) फोटो ठेवावा. कारण जेथे रामाचे नाव आहे, तेथेच हनुमानाचा वास असतो.
४. दीप आणि नैवेद्य: देवासमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. धूप आणि अगरबत्ती लावून वातावरण मंगलमय करावे. शक्य असल्यास देवाला मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा.
पठणाचे नियम:
दररोज एकाग्र चित्ताने ११ वेळा हनुमान चालीसा म्हणावी.
एक विशेष बदल: चालीसाच्या शेवटच्या कडव्यात जिथे "तुलसीदास सदा हरि चेरा" असे येते, तिथे तुलसीदासांच्या ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे. (उदा. [तुमचे नाव] सदा हरि चेरा...)
असे सलग ११ दिवस करावे.
Astro Tips: केवळ कष्ट पुरेसे नाहीत! भाग्याची साथ मिळवण्यासाठी करा 'हे' ३ साधे उपाय
शेवटच्या दिवशीचा विधी (११ वा दिवस):
११ व्या दिवशी नेहमीप्रमाणे ११ वेळा हनुमान चालीसा म्हटल्यानंतर शेवटी एकदा 'बजरंग बाण' अवश्य म्हणावा. यामुळे संकल्पाची सांगता होऊन हनुमानाचे विशेष संरक्षण कवच प्राप्त होते.
या व्रताचा लाभ:
अत्यंत श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने हे व्रत केल्यास रखडलेली कामे मार्गी लागतात. हनुमानाची शक्ती आणि रामाचा आशीर्वाद यामुळे भक्ताचे मानसिक बळ वाढते आणि कार्यसिद्धी होते.