Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:45 IST2026-01-30T15:44:52+5:302026-01-30T15:45:48+5:30

Vastu Tips for Dry Tulasi Plant: तुळशीची निगा राखूनही ती वाळली तर मन व्यथित होते, मात्र हा केवळ नैसर्गिक संकेत नाही, तर यामागे दडलेले वास्तू शास्त्राचा अन्वयार्थही जाणून घ्या. 

Vastu Tips: According to Vastu Shastra, if the basil in your house dries up, it means that a major obstacle to your family has been averted! | Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय!

Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय!

तुळस ही केवळ एक वनस्पती नसून ती घराचे 'संरक्षण कवच' मानली जाते. घरातली तुळस अचानक वाळली की आपण घाबरतो, पण त्यामागे एक अत्यंत सकारात्मक आणि शास्त्रशुद्ध दृष्टिकोन दडलेला आहे. याबाबत वास्तू तज्ज्ञ काय सांगतात ते पाहू. 

Ritual: स्मशानातून परतल्यावर 'आंघोळ' का करावी लागते? केवळ स्वच्छता की आणखी काही?

घराच्या अंगणात डोलणारी हिरवीगार तुळस ही सुख-समृद्धीचे प्रतीक असते. मात्र, कधीकधी योग्य निगा राखूनही तुळस अचानक वाळू लागते. अशा वेळी मनात पाल चुकचुकणे स्वाभाविक आहे. वास्तू शास्त्रात त्याचा वेगळा अर्थ घेतला जातो तर अध्यात्मशास्त्र सांगते की, तुळस जेव्हा अकाली वाळते, तेव्हा तिला 'तुळस वैकुंठी गेली' असे म्हणतात.

संकटाचे निवारण करणारी 'माऊली'

वास्तू शास्त्रानुसार तुळशीमध्ये वास्तूचे रक्षण करण्याची अफाट शक्ती असते. असे मानले जाते की, जेव्हा घरावर किंवा घरातील व्यक्तींवर एखादे मोठे संकट, आजारपण किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव येणार असतो, तेव्हा तुळस ते संकट स्वतःवर ओढवून घेते. ती स्वतः बलिदान देऊन तुमच्या कुटुंबाचे रक्षण करते. त्यामुळे तुळस वाळणे हे 'अशुभ' नसून, तुमच्यावरचे मोठे संकट टळल्याचा तो एक शुभ संकेत आहे.

Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत

अशा वेळी काय करावे? 

जेव्हा तुळस पूर्णपणे वाळते, तेव्हा तिला उपटून टाकू नका. त्याऐवजी खालील कृती करा: 

१. विनम्र निरोप: वाळलेल्या तुळशीला मनोभावे नमस्कार करा आणि तुमच्यावरील संकट स्वतःवर घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. 
२. काड्यांचा उपाय: त्या वाळलेल्या तुळशीच्या ५ ते ७ काड्या एकत्र बांधा. संध्याकाळी कृष्णमूर्ती किंवा विष्णूंच्या फोटोसमोर त्या काड्यांच्या साहाय्याने किंवा जवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील उरली-सुरली नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. 
३. नवे रोपण: वाळलेली तुळस सन्मानाने प्रवाहात विसर्जित करावी किंवा मातीत विलीन करावी आणि त्याच जागी लगेच नव्या तुळशीचे रोपण करावे.

माघी पौर्णिमा २०२६: ६२ वर्षांनंतर माघी पौर्णिमेला महायोग! 'हे' ३ उपाय पालटतील तुमचे नशीब; चुकवू नका ही सुवर्णसंधी  

वास्तू संरक्षणाची ताकद

तुळस ही घराची 'एक्झिट गेट' आणि 'एंट्री गेट' दोन्ही सांभाळते. ती घरातील दूषित हवा आणि दूषित विचार दोन्ही शोषून घेते. त्यामुळे तुळशीची सेवा करणे म्हणजे घराच्या ऊर्जेची निगा राखण्यासारखेच आहे. म्हणून तुळशी वाळली म्हणून व्यथित न होता दिलेला उपाय करा आणि वाळलेल्या रोपाच्या जागी नव्या तुळशीचे रोपण करून रोज मनोभावे पूजा करा. 

टीप : ही वास्तु तज्ञांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी लोकमत सहमत असेलच, असे नाही.

Web Title : तुलसी का सूखना: वास्तु के अनुसार, परिवार पर आने वाली आपदा टली।

Web Summary : वास्तु शास्त्र में, तुलसी का सूखना नकारात्मक ऊर्जा को अवशोषित करने और परिवार की रक्षा करने का प्रतीक है। आभार व्यक्त करें, सूखी टहनियों से उपाय करें और घर में सकारात्मक ऊर्जा बहाल करने के लिए एक नया तुलसी का पौधा लगाएं।

Web Title : Dying Tulsi Plant: A sign of averted family crisis, says Vastu.

Web Summary : In Vastu Shastra, a dying Tulsi signifies absorbing negative energy, protecting the family. Express gratitude, perform remedies with dried stems, and replant a new Tulsi to restore positive energy in your home.