शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:01 IST

Gurupushyamrut Yoga October 2024: या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्यांनी अवश्य हे उपाय करून पाहावेत, असे सांगितले जात आहे.

Gurupushyamrut Yoga October 2024: २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटांपासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग असणार आहे. संपूर्ण दिवस हा योग असणे विशेष मानले जात आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. 

पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, अशी मान्यता आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.  या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. 

शनी ही न्यायाची देवता मानली गेली आहे. आताच्या घडीला शनी आपले स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी असून, देवता गुरु ग्रह आहे. शनीची कृपादृष्टी मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी शनी ग्रह आणि गुरु ग्रहाच्या मंत्रांचे जप, उपासना तसेच या दोन्ही ग्रहांशी संबंधित उपाय करावेत. असे केल्याने शनी आणि गुरु ग्रहाचा कृपालाभ होऊ शकतो. तसेच या ग्रहांचे प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते.

साडेसाती सुरू आहे? कोणते उपाय करावेत?

- यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तुंचे दान करावे. साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे लाभप्रद ठरते. 

- समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

- सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन, उपासना आणि काही उपाय करावेत, असे सांगितले जाते. 

- साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.

- शनी बीज मंत्राचा जप करावा. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण करावे, असे उपाय सांगितले जातात.

- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून नियमितपणे अर्पण करावे.

- यासह गुरु ग्रहाशी संबंधित मंत्र, बीज मंत्र, श्लोक, स्तोत्रे, उपासना करावी. गुरु ग्रहाशी संबंधित यथाशक्ती उपाय करावेत, असे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :chaturmasचातुर्मासPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष